‘ग्रेट अंदमानी’ या विशेष धोकादायक आदिवासी जमातीतील () पाच जणांना करोना झाला आहे. दरम्यान, अंदमानातील दुर्गम भागातील आदिवासींमध्ये संसर्गाची ही पहिलीच घटना असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. येथील आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक अभिजीत रॉय म्हणाले की, बाधितांना येथील विलगीकरणात हलविण्यात आले आहे. त्यापैकी चार पुरुष, तर एक महिला आहे. ते सर्व जण यंत्रणांना सहकार्य करीत असून, त्यांना कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत. गेल्या आठवड्यात सर्वांची चाचणी करण्यात आली तेव्हा या पाच जणांना लागण झाल्याचे उघड झाले. ग्रेट अंदमानी, ओंगी, जारवा, शोम्पियन, उत्तर सेंटिनेल या पाच जमाती ‘पीव्हीटीजीएस’ अंतर्गत येतात. ग्रेट अंदमानी बोलीभाषा बोलतात. अंदमान आदिम जनजाती विकास समितीने २०१२मध्ये केलेल्या अभ्यासात त्यांची संख्या ५१ असल्याचे उघड झाले.
डॉ. रॉय म्हणाले, ‘प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी जारवांना पश्चिम किनाऱ्यावरील जारवा आदिवासी क्षेत्रात हलविले आहे. ओंगी जमातीसाठी चाचणी केंद्र उभारण्यात आले आहे. शोम्पियन आणि उत्तर सेंटिनेल या जमाती अति दुर्गम भागात व एकांतात राहात असल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.’ दरम्यान, अंदमान आणि निकोबार बेटांवर २५ ऑगस्टपर्यंत बाधितांची संख्या २,९४५ असून ३७ मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. ‘ग्रेट अंदमानीं’त करोना पोहोचल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यातील काही जण रोजगारासाठी पोर्ट ब्लेअर ते स्ट्रेट आयलंड असा प्रवास करीत विविध कामे करतात. त्यामुळे त्यांच्यात संसर्ग झाला असल्याचा अंदाज आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने सर्व उपाययोजना केल्या आहेत, असं आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक अभिजीत रॉय यांनी म्हटलंय.
वाचा :
वाचा :
एकाच दिवशी ७५ हजार रुग्ण
देशभरात एका दिवसात ७५ हजार नवीन करोना रुग्ण आढळण्याचा आजवरचा विक्रम गुरुवारी नोंदवण्यात आला. गुरुवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ७५ हजार ७६० रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ३३ लाख १० हजार २३४ वर पोहचली. दिवसभरात एक हजार २३ रुग्णांनी प्राण सोडल्यामुळे मृतांचा आकडा ६० हजार ४७२ वर गेला.
दुसरीकडे, करोनातून मुक्त झालेल्यांची संख्या २५ लाख २३ हजार ७७१ वर गेली. त्यामुळे करोनामुक्तांची टक्केवारी ७६.२४वर गेली. तर करोनारुग्णांचा मृत्यूदर १.८३पर्यंत खाली घसरला आहे. सध्या सात लाख २५ हजार ९९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २१.९३ टक्के आहे. देशातील करोना रुग्णांच्या संख्येने ७ ऑगस्ट रोजी २० लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला होता, तर २३ ऑगस्ट रोजी रुग्णसंख्या ३० लाखाच्या पलिकडे गेली होती.
आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत करोनाच्या तीन कोटी ८५ लाख ७६ हजार ५१० चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर बुधवारी एका दिवसात नऊ लाख २४ हजार ९९८ चाचण्या करण्यात आल्या.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times