संदीप सिंह याची सुशांतशी चांगली मैत्री होती. या प्रकरणात आता त्याचंही नाव येऊ लागलं आहे. तो देशाबाहेर पळण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी सीबीआय संदीपची चौकशी करणार असल्याचीही बातमी आहे. त्यातच भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची विनंती केली आहे.
वाचा:
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संदीप सिंह आणि विरोधी पक्षनेते यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या लाँचिंगच्या वेळचा हा फोटो आहे. संदीप सिंहचे भाजपशी जवळचे संबंध असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे.
सावंत यांनी ट्वीटच्या माध्यमातून काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ‘संदीप सिंहचा सहभाग असल्यामुळंचे आधीच्या फडणवीस सरकारनं बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीचे आदेश दिले नव्हते का? सीबीआय व ईडीला सुशांत प्रकरणात सहभागी करून घेण्यामागे संदीप सिंह हेच कारण आहे का? भाजपमधील अनेक वरिष्ठ नेत्यांचे बॉलिवूड कलाकारांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मग आतापर्यंत बॉलिवूडमधील ड्रग व्यवहाराबद्दल भाजपला माहिती नव्हती का?,’ असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले आहेत. राम कदम यांनी केलेल्या विनंतीमागील ही बाजूही समजून घ्यावी, अशी विनंती सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times