अकोला: बहीण-भावाचं नातं हे अतिशय पवित्र मानलं जातं. कितीही मोठं संकट ओढावलं तरी ते एकमेकांची साथ देण्यासाठी नेहमी उभे राहतात. परंतु आता याच नात्याला काळिमा फासणारी अशी भयंकर घटना समोर आली आहे. जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेत चुलत भावानेच आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. चुलत भावाच्या अत्याचारानंतर मुलगी गर्भवती झाली. अन् तिने बाळाला देखील जन्म दिला.
दुहेरी हत्याकांडाने कोकण हादरलं! व्यक्तीने पत्नी आणि मुलाला संपवलं; पोलीस तपासात गुंतले
विशेष म्हणजे हे प्रकरण कुटुंबियांनी दडपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून आता चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या भावाला अकोला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं असून तब्बल दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल आज गुरुवारी देण्यात आला आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मोठी भागात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय नराधमाने घरी एकटी असल्याचे पाहून अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितली तर वडिलांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. दरम्यान मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला खाजगी प्रसूती रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु येथील डॉक्टरांनी तिला जिल्हा स्त्री रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

दरम्यान १० फेब्रुवारी २०१५ रोजी तिची प्रसुती झाली. तेव्हा ही मुलगी सुमारे १८ वर्ष ९ महिन्याची झाली होती. या मुलीवर अन्याय झाल्याचा डॉक्टरांच्या लक्षात आलं. मग डॉक्टरांनी ही माहिती रामदासपेठ पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता मुलीने आरोपीचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन भादंविचे कलम ३७६(२)(फ), पोक्सोचे कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. पंकज असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. दरम्यान पीडित मुलीला आई नसून ते वडिलांकडे राहत होती. अत्याचार करणारा चुलत भाऊ हा नातेवाईक असल्यामुळे त्यांनी पोलिसांना धाव घेतली नाही. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाले. परंतु त्यानंतर सर्व प्रकरण उघडकीस आले.

२० वर्ष घेटा घातल्या, शेवटी वैतागून चक्क शिक्षणाधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवले लाखो रुपये

अकोला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.जे. शर्मा यांच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षपुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भादंवि ३७६ (२)(फ)अन्वये दहा वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा, कलम ५०६ मध्ये एक वर्ष सक्तमजुरी शिक्षा आणि पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. तर घटनेच्या वेळी पीडिता अल्पवयीन होती. याबाबत समाधानकारक पुरावा उपलब्ध न झाल्याने पोक्सो कायद्याच्या कलमामधून आरोपीस निर्दोष सोडण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा तपास तत्कालीन पीएसआय संजय मिश्रा यांनी केला. पोस्टे पैरवी म्हणून हेकॉ. गावंडे आणि प्रिया शेगोकर यांनी सहकार्य केले. साक्ष पुरावा ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here