पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी पेट्रोल दरात ११ पैशांची वाढ केली. गुरुवारी पेट्रोल १० पैशांनी महागले होते. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.५८ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८०.११ रुपयांवर स्थिर आहे. बुधवारी पेट्रोल दरवाढीला ब्रेक लागला होता, मात्र सलग दोन दिवस पुन्हा कंपन्यांनी पेट्रोल दरात वाढ केली.इंडियन ऑइलच्या आकडेवारीनुसार मागील १३ दिवसांमध्ये दोन दिवस पेट्रोलचा भाव स्थिर होता. तर उर्वरित ११ दिवसांत पेट्रोल १.५१ रुपयांनी महागले आहे.
दरवाढीने दिल्लीत पेट्रोलचा भाव ८२ रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. मुंबईत पेट्रोल ८९ रुपयांच्या नजीक पोहोचले आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.९४ रुपये आणि डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.९१ रुपये असून ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८३.४३ रुपये आहे. तर डिझेल ७७.०६ रुपये प्रती लीटर आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. मेक्सिकोच्या खाडीत लाॅरा चक्रीवादळाने धडक दिली आहे. चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर मॅक्सोकोतील बड्या तेल विहिरी बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे. गुरुवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ५ सेंट्सने घसरला आणि प्रती बॅरल ४३.३४ डॉलर झाला. बुधवारी तेलाच्या किमतीत ४ सेंट्सची वाढ झाली होती. ब्रेंट क्रूडचा भाव ४५.६६ डॉलर प्रती बॅरल झाला होता.
जागतिक बाजारात मागील महिनाभर कच्च्या तेलाचा भाव स्थिर आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने तेल आयातीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी मागील सहा दिवस पेट्रोल दरात वाढ केली होती. तर जवळपास तीन आठवडे डिझेलची किंमत स्थिर आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times