पुणेः सत्तातरांच्या नाट्यानंतर पवार आणि फडणवीस प्रथमच पुण्यात एकाच व्यासपीठावर एकत्र आले. उपमुख्यमंत्री आणि यांच्या भेटीचे निमित्त ठरले ते बाणेर येथील कोव्हिड सेंटरचा लोकार्पण सोहळा.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन सोहळा पार पडला. करोनाविरुद्धची लढाई एकत्र लढली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीस व मी कार्यक्रमासाठी एकत्र येणार म्हटल्यावर लगेच ब्रेकिंग न्यूज झाली. चंद्रकांत पाटील येणार असल्याचं कोणाला माहिती नव्हते, नाहीतर त्यांचेही नाव आले असते, अशी टोलेबाजी त्यांनी केली. तर, राजकीय भूमिका आणि मतं वेगवेगळी असू शकतात, मात्र निवडणूक झाल्यावर सगळं विसरुन जावं, असंह त्यांनी नमूद केलं आहे.

चिंचवड ऑटो क्लस्टर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या कोविड-१९ चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले, संकटकाळात राजकीय मतभेज बाजूला ठेऊन एकजूट दाखवण्याची गरज असून आम्ही या लढाईत एकत्र लढण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचं, अजित पवारांनी म्हटलं आहे.

वाचाः

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात जंबो रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. त्याखालोखाल क्षमता असलेले रुग्णालय बाणेर येथे सहामजली इमारतीत उभे करण्यात आले आहे. या रुग्णालयात ३१४ खाटा असून, २७० ऑक्सिजनसज्ज खाटा आणि ४४ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने ‘सीएसआर’च्या माध्यमातून हे रुग्णालय उभे केले असून, अवघ्या पंधरा दिवसांत त्याचे काम पूर्ण केले आहे. या ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक’ उभारण्यात आला असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ती परवानगीही मिळविण्यात आली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here