अलिबाग, रायगड : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नीने रायगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फायनान्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पैशासाठी तगादा लावल्यानेच नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फायनान्स कंपनीच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच देसाई यांनी आत्महत्या केली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आता या तक्रारीची दखल घेऊन खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nitin Desai Death: पाऊले चालती पंढरीची वाट! नितीन देसाईंच्या तोंडातून बाहेर पडलेलं शेवटचं वाक्य
एन. डी. फिल्म स्टुडीओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई (वय ५८ वर्षे) यांनी आत्महत्या केली होती. त्यांचे मृत्यू बाबत खालापूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
Nitin Desai: कर्जवसुलीसाठी नितीन देसाईंच्या मानसिक छळाचा आरोप, आरोपांची राळ उठताच कंपनी स्पष्टच म्हणाली….
नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांनी लेखी तक्रार दिली आहे. ‘ECL फायनांन्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. त्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे’, असे नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे.

नितीन देसाईंच्या आकस्मिक मृत्यूची नोंद, फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू

तक्रारीवरून खालापूर पोलीस ठाण्यात २६९/२०२३ भादवि ३०६, ३४ अन्वये वरील ECL फायनान्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी आणि इतर अशा एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग हे करीत आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग यांच्याकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here