मुंबई : मद्रास रबर फॅक्टरी किंवा MRF स्टॉक भारतातील सर्वात महागडा शेअर आहे. यावर्षी या कंपनीच्या शेअरने देशांतर्गत बाजारात एक लाख रुपयांचा टप्पा गाठला. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी या स्टॉकने जबरदस्त मुसंडी मारली. शुक्रवारच्या व्यवहार सत्रात चार टक्केहून अधिक उसळी घेत MRF शेअरचा भाव १११९३९.९५ रुपयांवर पोहोचला, जो या स्टॉकचा ५२ आठवड्याचा उच्चांक आहे. तर व्यवहार दिवसाखेर बीएसईवर MRF स्टॉक ३.६६% वाढ म्हणजे ३९१६.७० रुपये वाढीसह ११०८३९.८० रुपयांवर बंद झाला.

दरम्यान, MRF हा भारतातील सर्वात महागडा शेअर असला तरी जगभरात मात्र प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेची कंपनी, बर्कशायर हाथवे इंकच्या शेअरचा बोलबाला आहे. गुरुवारच्या सत्रात कंपनीचा शेअर १.३५% उसळीसह $ ५१,१००० (सुमारे ४४८१६७१० रुपये) म्हणजेच $७२०० (सुमारे ५,९६,४८८ रुपये) वर बंद झाला. म्हणजेच या कंपनीचा एकही शेअर जर कुणाकडे असेल तर तो सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मालक असेल.

Paytm शेअरची किंमत तेजीत वाढतेय, गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी? अधिक जाणूनच पैसे गुंतवा
बर्कशायर हॅथवे शेअरची कमाल
जगातील सर्वात महागडा बर्कशायर हाथवेचा स्टॉक गेल्या अनेक वर्षांपासून जगातील सर्वात महागडा स्टॉक राहिला आहे. कंपनी मालमत्ता आणि अपघाती विमा आणि पुनर्विमा, उपयुक्तता व ऊर्जा, मालवाहतूक रेल्वे वाहतूक, वित्त, उत्पादन, किरकोळ विक्री आणि सेवा प्रदान करते. कंपनीची सुरुवात १९३९ मध्ये झाली आणि बफे यांनी १९६५ मध्ये बर्कशायर हॅथवे काबीज केली. तेव्हा त्याच्या शेअरची किंमत $२० पेक्षा कमी होती.

MRF Share: एका दिवसात स्टॉक घेतली तुफानी उसळी, गुंतवणूकदारांना लागली लॉटरी, खरेदी करण्याची चढाओढ
कंपनी आपल्या ओळख कायम ठेवण्यासाठी धडपड करत होती आणि बफे यांच्या नेतृत्वात कंपनीने यशाची नवी शिखरे गाठली. यादरम्यान, कंपनीचा शेअरही तेजीच्या लाटेवर स्वार झाला आणि आज जगातील सर्वात महागडा शेअर बनला.

Zomato शेअर तेजीच्या ट्रॅकवर, गुंतवणूकदारांच्या जीवात जीव! आता खरेदी करावा? तज्ञ म्हणतात…
जगातील ९वी सर्वात मोठी कंपनी
बाजार मूल्यानुसार बर्कशायर हाथवे ही जगातील नववी सर्वात मोठी कंपनी असून कंपनीचे मार्केट कॅप $७७३.१७ अब्ज आहे. ९२ वर्षीय बफे यांनी २००६ पासून अब्जावधी डॉलर्सचा बर्कशायर हाथवे दान केला. गिव्हिंग प्लेज या मोहिमेचे ते सह-संस्थापक देखील असून ही मोहीम परोपकाराला प्रोत्साहन देते. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार बफे $११९ अब्ज संपत्तीसह जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीत ११.६ अब्ज डॉलरने भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here