नवी दिल्ली : रेटिंग एजन्सी फिचने अमेरिकेची क्रेडिट रेटिंग AAA वरून AA+ वर आणल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत नरमाई दिसून आली. या आठवड्यात फिचने मंगळवारी अमेरिकेचे रेटिंग कमी केले आणि बुधवारी सोन्याचे भाव घसरले. मजबूत डॉलर आणि मजबूत रोखे उत्पन्नामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव गुरुवारी तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आपटला. मजबूत यूएस खाजगी पगाराच्या डेटाने अमेरिका मंदी टाळू शकते अशी आस निर्माण झाली आहे. तसेच, फेड रिझर्व्ह अधिक दर वाढीसह पुढे जाऊ शकते.

Success Story: मुलीच्या अचानक निधनाने बाप खचला, पण तिच्या नावाने गाजवलं अख्ख मार्केट
सोन्याच्या दरात घसरण
MCX वर शुक्रवारी सोनीच्या दरात किरकोळ घसरण झाली तर चांदीचे दर ०.३३% घसरले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा ऑक्टोबर फ्युचर्स ४० रुपयांनी किंवा ०.०७% घसरून ५९ हजार ३९२ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करते. लक्षात घ्या की फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदरांवरील पुढील वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महत्त्वाच्या नोकऱ्यांच्या अहवालाची व्यापारी वाट पाहत असल्याने शुक्रवारी सोन्याचे भाव स्थिर राहिले.

फक्त ITR भरल्याने रिफंड येणार नाही, त्वरित ही चूक सुधारा नाहीत परतावा विसरा!
भारतीय बाजारात सोन्याची किंमत
गेल्या काही दिवसात सराफा बाजारात घसरण होऊनही सोन्याच्या दरात तेजी कायम आहे. शुक्रवारपर्यंत सोन्याच्या किंमतीत १% हून अधिक घसरली. फिचने यूएस क्रेडिट रेटिंग डाउनग्रेड केल्यानंतर मजबूत यूएस डॉलरमुळे सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू झाले. भारतीय बाजारात ibja दरांनुसार सोन्याचे भाव घसरले आहेत. गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव ५९ हजार ३८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचा भाव ५९ हजार २९८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.

या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

उल्लेखनीय आहे की २०२३ वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. भावांनी ६० हजार रुपयांचा आकडा ओलांडला आणि नवी उंची गाठली. त्यामुळे भारतात सोन्याच्या मागणीत घट झाली. तर एप्रिल-जून या तिमाहीत भारतातील सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वार्षिक ८% घट झाली आहे. मे-जून महिन्यात सोने-चांदीने खरेदीदारांना मोठा दिलासा दिला, त्यानंतर जुलैमध्ये धातूने दोन महिन्यात झालेली घसरण भरून काढली. तर आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा सोन्या-चांदीवर जागतिक घडामोडींचा परिणाम दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here