मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोव्हिड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप पेडणकरांवर केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झाल्याने उद्धव ठाकरे गटासाठी मोठी धक्का मानला जात आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

मुंबई महापालिकेने करोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत होता. कोव्हिड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याची तक्रार अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडे करण्यात आली होती. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन देसाईंबाबत कार्यवाही करताना RBI चे सर्व नियम पाळले, edelweiss चे स्पष्टीकरण
मुंबईत कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६ हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचं आरोप तत्कालीन विरोधी पक्षाने केला होता. हे कंत्राट तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप झाला होता.

तुला जे करायचे ते कर, किशोरी पेडणेकर ठाकरेंचं ब्रँड आहे ते मिटणार नाही; किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर

ईडीने २१ जून रोजी विविध ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यात ६८ लाख ६५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि जवळपास १५० कोटी रुपये किमतीची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. याशिवाय १५ कोटींच्या एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. २१ जूनला ईडीने केलेल्या छापेमारीत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांच्यासह १० ते १५ जणांचा समावेश होता.
नितीशकुमारांनी विरोधी पक्षांच्या एकतेचा पाया रचला, आता मोदींनी २०१४ ला जे केलं तेच करणार? JDU नेत्यांचे संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here