मुंबईः सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या ‘सिद्धीविनायक टेंपल’ या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.

या कार्यक्रमाला सिद्धीविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारीख, महेश मुदलीयार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, ॲङ पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, न्यासाच्या कार्यकारी अधिकारी प्रियंका छापवाले आदि मान्यवर उपस्थित होते.

राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळं राज्य सरकारनं खबरदारी म्हणून गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानंही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं भाविकांना ऑनलाइन दर्शनाची सोय व्हावी यासाठी मोबाईल अॅप लाँच करण्यात आलं आहे. तसंच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांना दर्शन घेणंही अॅपच्या माध्यमातून सोपे जाणार आहे.

करोना काळात मंदिरे बंद असल्याने भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येत नव्हते. भाविकांच्या सोईसाठी न्यासातर्फे ही विशेष सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘सिद्धीविनायक टेंपल’ या नावाने असणारे हे ॲप अँड्राईड आणि ॲपलवरुन डाऊनलोड करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून भाविकांना ऑनलाईन दर्शनाची वेळ बुक करता येणार आहे. या बुक केलेल्या वेळी भाविकांच्या नावे मंदिराचे पुजारी थेट गाभाऱ्यातून आशिर्वचन करतील. तसेच ॲपद्वारे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार असून मंदिरातील विविध सण- उत्सवांची अद्यायावत माहिती उपलब्ध होणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here