मुंबई: दोन वर्षापूर्वी मुंबईत जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या ११ नेत्यांवर उद्या कोर्टात दाखल करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री , सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ११ जणावर हे दोषारोपपत्रं दाखल होणार असून त्याची पत्रं घेण्यासाठी कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईत २०१८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यात आले होते. जमावबंदीचे आदेश असतानाही हे आदेश जुगारून आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमारे २० ते २५ नेते, कार्यकर्त्यांविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, सचिन अहिर, अशोक धात्रक, सुनील तटकरे, निलेश भोसले, अमित हिंदळेकर, अनिल कदम, किरण गावडे आणि सोहेल सुभेदार यांचा समावेश आहे. न्यायालयीन प्रक्रियेनुसार पोलिसांकडून यासंदर्भात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे. याप्रकरणाची ३१ ऑगस्ट रोजी शिवडी न्यायालयात सुनावणी आहे. त्या सुनावणीस हजर राहण्यासाठी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यातर्फे या नेते, कार्यकर्त्यांना दोषारोप प्रत घेण्यासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here