म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागांना एखाद्या विषयावर व्याख्यान, चर्चासत्र आयोजित करावयाचे असेल, तर कुलगुरूंची प्रशासकीय मान्यता आवश्यक असेल. प्रशासकीय मान्यतेशिवाय कोणताही कार्यक्रमासह पत्रकार परिषद ही घेता येणार नाही, असे निर्देश विभागप्रमुखांना प्रशासनाने शनिवारी (पाच ऑगस्ट) दिले. ‘शैक्षणिक स्वायत्तता’ असलेल्या विभागांमधील कार्यक्रमांवर मर्यादा आल्याने, निर्णयाची चर्चा विभागांमध्ये होती.

विद्यापीठ मुख्य परिसर, उपपरिसरात विविध ५५ शैक्षणिक विभाग, अध्यासन केंद्रे आहेत. या विविध विभागांमध्ये घेण्यात येणाऱ्या समारंभांवर आता विद्यापीठ प्रशासनाची करडी नजर असणार आहे. विभागप्रमुखांना आता कोणताही समारंभ घ्यावयाचा असेल, तर प्रशासनाची मान्यता आवश्यक असणार आहे. मान्यतेशिवाय कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही. शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागप्रमुखांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, अध्यासन केंद्राच्या वतीने कार्यक्रम घेण्यासाठी प्रशासनाची परवानगी बंधनकारक करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे परिपत्रक विभागप्रमुखांना पाठविण्यात आले. शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागप्रमुख, अध्यासन, संशोधन केंद्र संचालक यांना कळविण्यात आले. आपल्या विभागाच्या वतीने कोणताही कार्यक्रम, व्याख्यान, चर्चासत्र अयोजित करावयाचे असेल तर कुलगुरू यांची प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. प्रशासकीय मान्यतेशिवाय कोणताही कार्यक्रम घेण्यात येऊ नये. प्रशासकीय मान्यतेशिवाय कार्यक्रम घेतल्यास संबंधित विभागप्रमुख, संचालकांची जबाबदारी राहील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे पत्रात म्हटले आहे. यासह कुलगुरू यांच्या मान्यतेशिवाय पत्रकार परिषद घेण्यात येऊ नये, असेही आदेशित करण्यात आले.

वडिलांच्या जाण्यानं लेकीला दुःख अनावर, ना धो महानोरांवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

‘दहा दिवस आधी कळवा’

कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मान्यतेचा सविस्तर प्रस्ताव कार्यक्रमाच्या किमान दहा दिवस अगोदर कुलसचिव कार्यालयामार्फत कुलगुरूंना सादर करणे आवश्यक असणार आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर कार्यक्रमाविषयीची माहिती, पत्रिका दिली जाणार नाही. सर्व शैक्षणिक, अध्यासन संशोधन केंद्र संचालक यांनी यांची नोंद घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

अट्टल गुन्हेगाराचे मुलींना पाहून अश्लिल हावभाव; पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकल्या

अंकुश कुऱ्हाडे हर्सुल तुरुंगात स्थानबद्ध

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सोयगाव पोलिस ठाण्याच्या हद्यीतील अंकुश संतोष कुऱ्हाडे (वय २७, रा. नारळीबाग, सोयगाव, ता. सोयगाव) याच्याविरोधात एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश निघाला होता. अंकुश कुऱ्हाडे यांनी सुरतवरून अटक करून एक वर्षाकरिता हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले आहे. पोलिस अधीक्षक कलवानिया यांच्या कार्यकाळात एमपीडीएअंतर्गत कारवाई झालेला हा आठवा आरोपी आहे.

अंकुश संतोष कुऱ्हाडे याच्याविरुद्ध सोयगाव पोलिस ठाण्यात जबरी चोरी, मारहाण, गंभीर दुखापत करणे, दंगा, इत्यादी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोकांना धमकावून पैसे मागणे, नाही दिले तर मारहाण करणे त्याच्या अशा कृत्यामुळे सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातारण निर्माण झाले होते. त्याच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती. परंतु त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवाई चालूच होत्या. त्यामुळे एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यानुसार त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक होते. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व सोयगाव पोलीसांनी त्याच्या विरोधात एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी १८ जुलै २०२३ रोजी अंकुश कुऱ्हाडे याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’च्या अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश पारित केला होता. परंतु कारवाईचा सुगावा लागताच तो परिसरातून पसार झाला होता. परंतु पोलिसांनी त्याचा कसोशीने शोध घेऊनन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने त्याला गुजरातमधील सुरत येथील कतारगाम परिसरातून अटक करून तीन ऑगस्ट रोजी मध्यवर्ती कारगृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश वाघ, सपोनि अनमोल केदार, उपनिरीक्षक विजय जाधव, पोलिस अंमलदार नामदेव सिरसाठ, कासीम शेख, दिपक सुरवसे, नरेंद्र खंदारे, राजू बर्डे, रवींद्र तायडे यांनी केली आहे.

वनविभागाच्या परीक्षेत पास करून नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, शिक्षण क्षेत्रात खळबळ

शेजाऱ्याने केला विनयभंग; दोन जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : घरात एकटी असल्याचे पाहून शेजारी राहणारा युवक घरात आला. त्याने १३ वर्षांच्या मुलीसोबत तिच्या इच्छेविरूद्ध तिच्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मिसारवाडी येथे घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून, तक्रारदार महिला कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. घरात त्यांची १३ वर्षांची मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपी दादाराव शिंदे (रा. मिसारवाडी) घरात आला. त्याने मुलीसोबत गैरकृत्य केले; तसेच तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकारानंतर दादाराव शिंदे यांनी पीडित मुलीला ही गोष्ट कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने दादाराव शिंदे याच्या नातेवाइक महिलेला हा प्रकार सांगितला. सदर महिलेनेचे पीडित मुलीच्या आईलाच शिवीगाळ केली. ही घटना चार ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दादाराव शिंदे याच्यासह महिलेच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजीनगरकरांनो, Single Use Plastic वापरू नका; एवढा दंड आकारला जाईल; कोणत्या साहित्यावर बंदी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here