नाशिक : नाशिकमध्ये आणखी एक बडा मासा एसीबीच्या गळाला लागला आहे. तब्बल १५ लाखांची लाच घेताना नाशिकचे तहसीलदार नरेश कुमार बहिरम (रा. फ्लॅट नंबर -६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक ) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडत आहे.

मिळालेलम्या माहितीनुसार, नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील एका जमिनीतून मुरूम उत्खननाचे प्रकरण समोर आले होते. त्याबाबत नियमानुसार पाचपट दंड आणि जागा मालकास जागा भाडे असे मिळून एकूण १ कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपये इतका दंड ठोठवण्यात आला होता. मात्र, या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चौकशीसाठी तहसीलदार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते. याबाबत जागेची पडताळणी करण्यासाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम हे राजुर बाहुला येथील तक्रारदारांच्या जमिनीवर गेले. त्या ठिकाणी त्यांनी या प्रकरणी तडजोड करण्यासाठी व त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी केली होती.

परदेशातील मोठ्या पगाराची नोकरी डावलली, उच्चशिक्षित तरुण APMCमध्ये भाजीविक्रीकडे परतले!
याबाबत ५२ वर्षीय तक्रारदारानी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची शहानिशा करून लाचलुचपत विभागाने सापळा रचत तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांना शहरातील कर्मयोगी नगर येथील त्यांच्या मेरिडियन गोल्ड येथील बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

नाशिकच्या लाचखोरीचे प्रकरण पावसाळी अधिवेशनात गाजल्यानंतर देखील सरकारी कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाचखोरीचे प्रकरण समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अनेक बडे मासे अडकले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बडा मासा १५ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Pune News: शिंदे-अजित पवारांशी शहांची चर्चा, फडणवीसांना तातडीने बोलावलं; पुण्यात रात्री घडामोडींना वेग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here