राफेल विमाने भारतात आल्यानंतर देशाचे मनोबल तर वाढलेच, पण त्या बरोबरच सैन्यदलाचे मनोबल देखील वाढले. मात्र, राहुल गांधी देशाबरोबरच सैन्यदलाचे मनोबल खच्ची करण्याच्या कामाला लागलेले आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.
या वेळी गिरिराज सिंह यांनी करोनाच्या मुद्द्यावरूवनही राहुल गांधींवर निशाणा साधला. गिरिराज सिंह म्हणाले की, ‘ अशाच प्रकारे covid-19 च्या काळात जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॅनेजमेंट गुरू मानले जात असताना, राहुल गांधी मात्र करोनावर लस कधी येणार, हे विचारत आहेत. हा काही मुलांचा खेळ नाही. करोनावरील लस तयार करण्यासाठी प्रोटोकॉल आहे. तीन कंपन्या त्यावर काम करत आहेत. संकटाच्या काळात काम केल्यानंतर देखील राहुल गांधी मात्र देशातील लोकांना निराश करण्याचे काम करत आहेत आणि हे राष्ट्रहिताचे नाही.’
क्लिक करा आणि वाचा-
जगातील अन्य देशांशी तुलना करता भारतात रुग्ण बरे होण्याच्या दराची आणि मृत्यूदराची स्थिती चांगली असल्याचे गिरिराज सिंह म्हणाले. आमचा रुग्ण बरे होण्याचा दर ७५ टक्क्यांहून अधिक आहे. तसेच मृत्युदर देखील २ टक्क्यांच्या खाली आहे. आता देशात १,००० टेस्टिंग लॅब आहेत. या लॅबमध्ये दररोज १० लाखांहून अधिक चाचण्या होत आहेत, असेही केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times