नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून वर आले. त्यानंतर आता पत्र लिहिणाऱ्या नेत्यांपैकी एका नेत्याने यांच्याबाबत नवे वक्तव्य केले आहे. सतत दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आता पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी राहुल गांधी हे उपयुक्त व्यक्ती नाहीत असे वक्तव्य या नेत्याने केले आहे. राहुल गांधी यांच्याकडेच पुन्हा पक्षाचे नेतृत्व देण्याची मागणी पक्षातून होत आहे. तसेच पक्षातील अनेक नेते राहुल गांधी यांनाच पुन्हा पक्षाचे अध्यक्ष बनवा, अशी मागणीही करत आहेत.

एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. आपले नाव न जाहीर करण्याच्या अटीवर या नेत्याने हे वक्तव्य केले आहे. खरेच राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करू शकतील का, हे सांगण्याचा स्थितीत आम्ही नाही आहोत आणि सन २०२४ मध्ये ४०० जागा निवडणून आणण्यात खरेच राहुल गांधी आमची मदत करतील का, हे सांगता येत नाही, असे हा नेता म्हणाला. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षेप्रमाणे जागा मिळू शकलेल्या नाहीत याची जाणीव आम्हाला असणे गरजेतेआहे, असेही हा नेता पुढे म्हणाल्याचे वृत्तात म्हटले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरच राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांची पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी नियु्क्ती करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी लिहिलेल्या पत्राचा मजकूर याच नेत्याने तयार केला होता. नागपूरपासून ते शिमल्यापर्यंत (देशाच्या अर्ध्या उत्तरेकडील भागात) काँग्रेस पक्षाचे एकूण १६ खासदार आहेत. यांपैकी देखील ८ फक्त पंजाबमधून आहेत. आम्ही भारतात आहोत आणि सत्य काही वेगळेच आहे, हे आम्हाला आता मान्य करायला हवे. जर बैठक झालीच तर मी या मुद्द्यावर माझे विचार नक्कीच मांडेन, असे हा नेता म्हणाल्याचे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

ही व्यक्तींची लढाई नसून ती मुद्द्यांची लढाई आहे, असेही हा नेता पक्षाप्रती आपली निष्ठा व्यक्त करताना म्हणाला. या मुळे घटनात्मक मूल्यांवर आधारित वैकल्पिक व्यवस्था निर्माण करण्यास मदत मिळेल आणि त्यामुळे नक्कीच काँग्रेस पक्षाला मदत होईल, असेही पुढे हा नेता म्हणाला.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here