नवी दिल्ली: देशाचे परराष्ट्र मंत्री यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून शेजारी देश पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्या देशांनी दहशतवाद्यांना तयार करून इतर देशांमध्ये पाठवण्याचे काम केले, ते देश देखील आपण दहशतवादाने पीडित असल्याचे सांगत आहेत. या वाईट गोष्टीचे समर्थन करणारी व्यवस्था बंद करण्यासाठी जागतिक स्तरावर एक नीती तयार करण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य देशाचे एस. जयशंकर यांनी शुक्रवारी केले.

आंतरराष्ट्रीय दबाावमुळे दहशतवादी समूहांना, तसेच गुन्हेगारी गटांना मदत करण्याशी, तसेच त्यांना प्रशिक्षण आणि सूचना देण्याशी संबंधित असलेल्या एका देशाला इच्छा नसतानाही आपल्या क्षेत्रात दहशतवादी आणि संघटीत गुन्हेगारीशी संबंधित नेते असल्याचे स्वीकारावे लागले, असेही पाकिस्तानच्या संदर्भात परराराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे. गेल्याच आठवड्यात पाकिस्तानने एक वैधानिक नियामक आदेश (SRO) जारी केला. या आदेशात दाऊद इब्राहिम, हाफिझ सईद, मसूद अजहरसह एकूण ८० दहशतवाद्यांच्या नावांचा उल्लेख आहे. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सद्वारे (Financial Action Task Force) आपले नाव काळ्या यादीत टाकले जाऊ नये हाच हा आदेश काढण्यामागील उद्देश आहे.

आमच्या देशाकडे बरेच काही आहे: जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे द एनर्जी अॅण्ड रिसोर्सेस इन्स्टीट्यूटच्या (टेरी) एका कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी भारताची वैश्विक दृष्टी, स्वावलंबनाचे सार, बहुपक्षीयतेसह विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले. आमच्या देशाकडे बरेच काही असून ते पुढे विकसित करण्याचा विश्वास असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

हशतवाद हा कॅन्सर आहे- परराष्ट्र मंत्री

हा कॅन्सर असून हा कॅन्सर एखाद्या साथीच्या आजाराप्रमाणेच संपूर्ण मानवतेला ग्रासून टाकतो, असे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी जहशतवादाच्या आव्हानावर बोलताना म्हटले. एखादी विशिष्ट घटना घडल्यानंतर जगभरात दहशतवाद आणि जागतिक साथीच्या आजाराबाबत एक भान आले आहे. या वेळी त्यांनी ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. दहशतवादाविरोधात जगभरात अनेक प्रकारचे तंत्र विकसित केली गेली आहेत, मात्र जगापुढे अजूनही आंतरराष्ट्रीय दहशतवादावर व्यापक अशा मोहिमेची कमतरताच आहे, तसेच संयुक्त राष्ट्राचे सदस्य देश देखील काही मूलभूत सिद्धांताबाबत उहापोह सरू आहे, असेही परराष्ट्र मंत्री म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here