म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : डॉक्टरांची परिषद सुरू असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन नवी मुंबईतील एका डॉक्टरचे जागीच निधन झाल्याची घटना शुक्रवारी नेरूळ येथे घडली. या परिषदेला २५ हून अधिक नामांकित डॉक्टर उपस्थित होते. मात्र ते सहकारी डॉक्टरचा प्राण वाचवण्यात अपयशी ठरले. या घटनेमुळे नवी मुंबईत हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नेरूळ येथील हॉटेलमध्ये डॉक्टरांसाठी अद्ययावत ज्ञान उपक्रमांतर्गत डी. वाय. पाटील रुग्णालयातील छाती व श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. अभय उप्पे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, ते परिषदेमधून घरी जाण्यासाठी निघाले. परंतु हॉटेलच्या लिफ्टजवळ आल्यानंतर, छातीत जोरदार कळ आल्याने ते जमिनीवर कोसळले.

मुंबईतील धक्कादायक प्रकार; पीडितेवर सामूहिक अत्याचार, फोटो दाखवून लग्न मोडलं, पण पोलिसाची आरोपींना क्लीन चिट

उपस्थित डॉक्टरांनी लिफ्टजवळ धाव घेतली. तिथेच डॉ. अभय उप्पे यांना सीपीआर देण्यात आला. उपस्थित डॉक्टरांनी ताबडतोब कार्डियाक अॅम्ब्युलन्स बोलावून घेतली. डॉ. उप्पे यांना रुग्णवाहिकेत ठेवून उपचार सुरू करण्यात आले. ही रुग्णवाहिका अपोलो रुग्णालयात चेस्ट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट यांनी अतोनात प्रयत्न केले. परंतु, त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

दरम्यान, अनेक नामवंत डॉक्टरांच्या उपस्थितीत होत असलेल्या वैद्यकीय परिषदेतच एका डॉक्टरने आपले गमावल्याच्या या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here