लखनऊ: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांचा आक्रोश सुरू झाला. कुटुंबीय त्यांना घरी घेऊन गेले. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांच्या शरीराची हालचाल जाणवू लागली. त्यामुळे कुटुंबीय त्यांना घेऊन पुन्हा रुग्णालयात धावले. तेव्हा त्यांना बरं वाटू लागलं होतं. बघेल यांनी भाजपचे आग्रा जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं आहे.कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी महेश बघेल यांना मृत घोषित केल्यावर त्यांना सराय ख्वाजा येथील राहत्या घरी आणण्यात आलं. कुटुंबियांना आक्रोश सुरू केला. आप्तेष्ट मंडळी ओक्साबोक्शी रडू लागली. तितक्यात बघेल यांनी डोळे उघडले. त्यांच्या शरीरात हालचाल जाणवू लागली. त्यामुळे कुटुंबियांनी न्यू आग्रा येथील एका रुग्णालयात धाव घेतली. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचा रक्तदाब ११४/७० असल्याची माहिती लहान भाऊ लाखन सिंह बघेल यांनी दिली. महेश बघेल यांच्यावर पुष्पांजली रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. सोशल मीडियावर अनेकांनी स्टेटस ठेवले. त्यांच्या निधनानं वृत्त व्हायरल झालं. कुटुंबियांनी शोकाकुल वातावरणात बघेल यांना घरी आणलं. तिथे त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या शरीराची हालचाल कुटुंबियांना जाणवली. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आशेचा किरण दिसू लागला. त्यानंतर त्यांना न्यू आग्रा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांच्या छातीमध्ये संसर्ग झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here