मुंबई : काशी विश्वेशराला गेलेल्या औरंगजेब बादशाहच्या राण्यांना तेथील हिंदू पुजाऱ्यांनी भ्रष्ट केलं. ही गोष्ट जेव्हा औरंगजेबाला कळाली तेव्हा त्याने काशी विश्वेश्वराची तोडफोड केली, असं विधान ज्येष्ठ साहित्यिक, ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी केलं. त्याचवेळी सतीप्रथा बंद करणारा औरंगजेब हा पहिला राजा होता, असा दावाही त्यांनी केला. दुसऱ्या बाजीरावाचा अपवाद वगळता बाकी पेशवे फक्त दुष्ट नव्हते तर नीच होते, असं तोंडसुखही त्यांनी घेतलं.

‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तरी रौप्य महोत्सवी सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, लेखक भालचंद्र नेमाडे यांनी खळबळजनक आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका उद्धृत केली. गेल्या काही महिन्यांपासून ज्या मुद्द्यांवरून सर्वाधिक वाद होतोय त्या औरंगजेब, ज्ञानव्यापी मशीद अशा विषयांना स्पर्श करत त्यांनी खरा इतिहास वाचत जा, असा सल्लाही दिला. त्याचवेळी मंचावर उपस्थित शरद पवार यांनी मात्र आपल्या भाषणात व्यासपीठाला साजेसं भाषण करत मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ही संस्था मागच्या १२५ वर्षांपासून किती छान काम करते, याचा पट मांडला.

पत्नीने जीव सोडला, पती काहीच करू शकला नाही, २ दिवसांनी फ्लॅटचं दार तोडलं, पोलिसांच्या काळजाचं पाणी पाणी झालं
औरंगजेब बादशाहच्या राण्यांना तेथील हिंदू पुजाऱ्यांनी भ्रष्ट केलं

“त्याकाळी बऱ्याच मुस्लिम राजांच्या हिंदू राण्या होत्या. हिंदू मुस्लिम भेद त्यावेळी फार नसायचा. शहाजहान राजाची आई तर हिंदूच होती. औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या होत्या. त्या काशी विश्वेश्वराला दर्शनाला गेल्या. त्या परत आल्याच नाहीत. छावणीतल्या लोकांनी ही गोष्ट औरंगजेबाला सांगितली. काय झालं असेल याची चौकशी करत करत सगळे गेले तर… काशी विश्वेश्वरामध्ये एक भुयार होतं. तिथे मंदिरातील पंडित बायकांना नेऊन भ्रष्ट करायचे. औरंगजेबाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याने मग तिथे मोडतोड केली. तसेच ही असली माणसं नकोत म्हणून त्याने काहींना मारलं तर त्याला पुढे इतिहासात हिंदूद्वेष्टा म्हणून हिणवलं गेलं. पण मग त्याच्या सैन्यात ५० टक्क्यांहून अधिक लोक हे हिंदू होते…!”.

जयंत पाटलांच्या भेटीनंतर ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले ‘आमचं ठरलंय…!’
पेशवे फक्त दुष्ट नव्हते तर नीच होते

दुसरा बाजीराव हा फार मोठा माणसू होता. इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांनाही मी सांगितलं की पेशव्यांच्या तावडीतून त्यांनी या राष्ट्राला वाचवलं आणि इंग्रजांकडे सोपवलं. कारण त्यावेळी जे पेशवे होते, ते सगळे दुष्टच नाही तर नीच वृत्तीचे होते. हा नानासाहेब पेशवा… कुठेही गेला की याचं पत्र असायचं… तो गोविंदपंत बुंदेले कोणतरी तिकडे पंजाबात होता. त्याला नानासाहेब पेशव्यांचं पत्र यायचं की, या दिवशी मी अमुक तमुक ठिकाणी येतोय. आठ ते दहा वर्षांच्या दोन शुद्ध आणि सुंदर मुली तयार ठेवाव्यात. ते पत्र मी स्वत: वाचलेलं आहे.

“४०-४२ वर्षांचा नानासाहेब पेशवा ८ ते १० वर्षांच्या कोवळ्या पोरींबरोबर काय करत असेल? दर ठिकाणी अशा पोरी तयार ठेवायला सांगून त्यांना मारून वगैरे टाकत असेल की काय कळत नाही… म्हणजे असे हे पेशवे होते”, असं नेमाडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here