मुंबई : केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने प्रेक्षकांवर अक्षरशः गारुड केलं आहे. फक्त महिलाच नाही, तर पुरुषांनीही ही ‘बाईपणाची गोष्ट’ डोक्यावर घेतली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. सहा बहिणींची कथा अनेकांना आपल्या घरचीच वाटत आहे. या सिनेमाची भुरळ ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरलाही पडली आहे. सचिनने ट्वीट करत चित्रपटाचं कौतुक केलं असून आई आणि मावशी कधी हा सिनेमा पाहतील, असं झाल्याच्या भावना सचिनने व्यक्त केल्या आहेत. तर अभिनेत्री दीपा परबला सचिनने व्हिडिओ कॉल करुन शुभेच्छा दिल्या.

“जवळ येण्यासाठी वेगळ व्हावं लागतं… ‘बाईपण भारी देवा’ ही सहा बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. हा मराठी चित्रपट मी खूप एन्जॉय केला. आता माझ्या आई आणि मावशीने सुद्धा तो पाहावा, याची मी वाट पाहतोय. शिवाय, सिनेमातील कलाकारांना भेटणं हा एक सुंदर अनुभव होता!” अशा आशयाचं ट्वीट सचिनने केलं आहे. रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर आणि सुकन्या मोने यांच्यासोबतचा फोटो त्याने शेअर केला आहे.

दीपा परबला व्हिडिओ कॉल

चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला अभिनेत्री दीपा परब-चौधरी उपस्थित राहू शकली नव्हती. त्यामुळे दीपाला व्हिडिओ कॉल करण्यात आला. सचिनने दीपाशी गप्पा मारल्या. “ओह शी इज द सेम गर्ल… हेलो… खूप आवडला सिनेमा. काँग्रॅच्युलेशन्स. भेटुया आपण नक्की. मी अजितला सांगेन.. माझ्या बाजूलाच आहे. मी सांगेन, नक्की भेटुया. ऑल द बेस्ट” अशा शब्दात सचिनने दीपाचं कौतुक केलं. सचिनसोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना ती हरखून गेली होती. तिने आपल्या भावना इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत.

नितीन देसाईंबाबत कार्यवाही करताना RBI चे सर्व नियम पाळले, edelweiss चे स्पष्टीकरण

दीपा परबची इन्स्टाग्राम पोस्ट काय?

सचिन… द सचिन तेंडुलकर… लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मी देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं… ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे. ‘बाई पण भारी देवा’ चित्रपटाने खरंच आम्हाला भरपूर काही दिलंय पण सचिन तेंडुलकर येऊन चित्रपट बघतील… त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नांत देखील विचार नव्हता केला. पण…YES…It’s Fact… शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण.

बाईपण भारी देवाचे ३७ दिवस; बॉलिवूडला जोरदार टक्कर, चित्रपटाच्या कमाईचा एकूण आकडा आला समोर
मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे मला प्रत्यक्ष स्क्रीनिंगला जाता आले नाही. ज्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती त्याला भेटण्याची संधी समोरून चालून आलेली असता मी त्या संधीला मुकले असं वाटत असतानाच मला व्हिडीओ कॉल येतो… आणि प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला जातो… आम्हा सर्व जणींचा अभिनय, चित्रपट त्यांना आवडला हे ऐकून खूप छान वाटलं… अजूनही हे सर्व काही स्वप्नवतचं आहे. THANK YOU @saneness_ आणि अजित भुरे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या ह्या एका अविस्मरणीय फोन साठी.

बाईपण भारी देवा’ चित्रपटाला तोबा गर्दी, गर्दी पाहून व्यवस्थापकांची तारांबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here