• काँग्रेसने नेमले लोकसभा समन्वयक

नाशिक : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने राज्यभर लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चार पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली आहे. त्यात राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांचा समावेश आहे.आगामी निवडणुकांत पक्षाला कोठे अनुकूल आणि कोठे प्रतिकूल स्थिती आहे याचा अंदाज घेण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज, सोमवार (दि. ७)पासून त्यांचे दौरे सुरू होणार असून, १६ किंवा १७ ऑगस्टला ते पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करणार आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये होणार असून, त्यासाठीच्या तयारीला हळूहळू वेग येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. लोकसभा क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती मिळावी याकरिता राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांनी लोकसभा क्षेत्रनिहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती जाहीर केली.चौघांकडे चार मतदारसंघजिल्ह्यातील चार प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्याकडे नंदुरबार लोकसभा, माजी शहराध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी शरद आहेर यांच्याकडे ठाणे लोकसभा, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे धुळे लोकसभा आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.थोरातांवर नाशिकची जबाबदारीनाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी माजी महसूलमंत्री तथा विधिमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. डॉ. राजू वाघमारे आणि ब्रिज दत्त हे या मतदारसंघांसाठी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. सद्यस्थितीत दोन्ही मतदारसंघांमध्ये हेमंत गोडसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार हे महायुतीचे खासदार आहेत. तेथे काँग्रेसचे सक्षम उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याचे आव्हान थोरातांना पेलावे लागणार आहे.आजपासून दौरे अन् बैठकीलोकसभा निरीक्षक व समन्वयकांच्या प्रमुख उपस्थितीत ७ ते १४ ऑगस्टदरम्यान लोकसभा मतदारसंघांचे विधानसभानिहाय दौरे करून बैठकी घेण्यात येणार आहेत. त्या-त्या लोकसभा क्षेत्रातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटना, विभाग व सेलचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना बैठकीसाठी निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यातून पक्षाची तेथील नेमकी स्थिती समजू शकणार आहे.

  • उड्डाणपूल होईना; वाहतूक कोंडी सुटेना!

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव : शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. परंतु, सहा वर्ष उलटूनही हे काम रखडलेलेच आहे. ठेकेदाराला महापालिकेकडून केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार होत आहेत. रखडलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत असून, प्रशासन मालेगावकरांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील पहिल्यावहिल्या उड्डाणपुलाचे एप्रिल २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-भूमिपूजन झाले होते. प्रत्यक्ष काम सुरू व्हायला नोव्हेंबर २०१७ उजाडले. सहा वर्षांत जेमतेम ५०० मीटर लांबीचा उड्डाणपूल देखील पूर्ण न होऊ शकल्याने ठेकेदार, महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींविषयी नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. उड्डाणपूल कामात सुरुवातीपासूनच अडथळ्याची शर्यत आहे. अतिक्रमणे, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात न आल्याने कामाचा वेग मंदावला. करोना कालावधीत सव्व्वा वर्ष काम बंद पडले. उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूस अंडरपासच्या मागणीने राजकारण रंगले. ठेकेदाराची कामातील दिरंगाई अनेकवेळा महासभेत चर्चेचा विषय ठरली. या सर्वांत शहरातील नागरिक भरडला जात आहे. या रस्त्याने प्रवास नको म्हणून ते थेट मनमाड चौफुलीकडून शहराबाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here