वृत्तसंस्था, तेलंगण : एक काळ माओवादी म्हणूनही गाजविलेले तेलंगणचे प्रसिद्ध लोकगायक गदर यांचे रविवारी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. क्रांतिकारी गीतांसाठी ते अतिशय लोकप्रिय होते. तेलंगण राज्यनिर्मितीच्या मागणीचा ते आवाज होते. माओवादी होते. नंतरच्या काळात लोकशाहीवर विश्वास करीत ते मुख्य प्रवाहात सहभागी झाले. त्यांच्यावर आज, सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी हैदराबादच्या ए. बी. स्टेडियममध्ये त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ठेवले जाणार आहे.

गुम्मडी विठ्ठल राव हे गदर यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म मेडक जिल्ह्यातील तूप्रान येथे सन १९४९मध्ये झाला. गदर माओवादी होते. माओवादी चळवळीत बंदुकीसोबत गदर यांनी रचलेले गाणे आणि जननाट्य मंडलीच्या आकर्षणातून शेकडो तरुण चळवळीकडे आकर्षित झाले होते. बराच काळ ते भूमिगतही होते. मात्र माओवाद्याच्या निवडणुकीला विरोध असलेल्या विचारांपासून दूर जात गदर यांनी नंतर स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. ते मुख्य प्रवाहात आले. लोकशाहीवरील विश्वास व्यक्त केला. सन २०१८मध्ये तेलंगण विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा मतदान केले होते.

Maharashtra Politics: संभाजी भिडे आणि भाजपच्या माजी आमदाराची गुप्त भेट, देवेंद्र फडणवीसांनी धाडला निरोप?

खम्मममध्ये २ जुलै रोजी झालेल्या काँग्रेसच्या एका मेळाव्यात सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनी या मेळाव्याला संबोधित केले होते. त्यानंतर २० जुलै रोजी हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्यांना हैदराबादच्या अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. ३ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली. यातून ते बरे होत असतानाच फुप्फुस आणि मुत्राशयाचा जुना त्रास उफाळून आला. यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या निधनावर विविध राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

ती गोळी तशीच राहिली

१९९०च्या दशकात गदर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर बेधुंद गोळीबार केला. यात ते जखमी झाले. त्यावेळी झाडली गेलेली एक गोळी त्यांच्या पाठीच्या कण्यात जाऊन अडकून पडली. अखेरपर्यंत ती गोळी तशीच राहिली.

1 COMMENT

  1. [url=https://vbspy.net/]Viber Activity Tracker App[/url] – How I started spying on my significant other in Viber, Tracking calls in Viber

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here