मुंबई: ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील मातोश्री बंगल्याच्या परिसरात विषारी साप शिरल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी दुपारी मातोश्री बंगल्याच्या आवारात कोब्रा शिरला होता. या सर्पाची लांबी चार फूट इतकी होती. येथील पाण्याच्या टाकीच्या मागे हा सर्प वेटोळे घालून बसला होता. साप दिसताच तातडीने वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोशिएशन संस्थेला फोन करुन सर्पमित्रांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आले. मातोश्री बंगल्याच्या आवारात एक नाग फिरत आहे. त्यासाठी आम्हाला सर्पमित्राची मदत हवी आहे, असा निरोप मातोश्रीवरुन सांगण्यात आला. त्यानंतर अतुल कांबळे आणि रोशन शिंदे हे दोन सर्पमित्र तातडीने मातोश्री बंगल्यावर पोहोचले. त्यांनी या नागाला सुरक्षितपणे पकडले आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर सर्पमित्रांनी या नागाला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

Video : रंग भुरकट, डोळे लाल; नाशकात आढळला अल्बिनो जातीचा दुर्मिळ साप

हा नाग पकडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्पमित्र अतुल कांबळे आणि रोशन शिंदे यांचे आभार मानले. हा नाग पाण्याच्या टाकीमागे लपून बसलेला होता. त्याची लांबी अंदाजे ४ फूट होती.

साफसफाई करतांना दरवाज्यातून निघाले तब्बल ३९ साप; बघणाऱ्यांचा उडाला थरकाप, गोंदियातील घटना

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील बंगल्यातही साप शिरला होता. संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे भांडूपमधील बंगल्यावर पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्या बंगल्याच्या आवारात साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. संजय राऊत हे बोलत असताना त्यांच्या खुर्चीपासून काही अंतरावर हा साप आढळला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

पत्रकार परिषदेच्या काहीच वेळानंतर संजय राऊतांच्या निवासस्थानी दिसला साप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here