रायपूर: प्रियकरावर नाराज झालेल्या अल्पवयीन प्रेयसीनं टोकाचं पाऊल उचललं. ती हायटेंशन टॉवरवर ८० फूट वर चढली. प्रेयसीचा राग दूर करण्यासाठी तिच्या पाठोपाठ प्रियकरही टॉवरवर चढला. त्यांना पाहून लोकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला. याची माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना समजावलं. बराच वेळ हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. अखेर दोघांची समजूत काढण्यात पोलिसांना यश आलं. त्यांनी दोघांना खाली उतरवलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गौरेला पेंड्रा मरवाही जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. इथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे गावातील तरुणाशीच प्रेमसंबंध होते. फोनवर बोलताना दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे नाराज झालेली मुलगी गावातून निघाली आणि हायटेंशन लाईनच्या ८० फूट उंच टॉवरवर चढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रेयसी टॉवरवर चढताच प्रियकरदेखील तिच्या पाठोपाठ टॉवरवर चढला. प्रेयसी टॉवरच्या टोकाला पोहोचली. दोघांना टॉवरवर पाहून ग्रामस्थ आणि कुटुंबीय घाबरले. ग्रामस्थ खाली जमले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. दोघांना खाली उतरण्याची विनंती करण्यात आली. मात्र दोघांनी खाली उतरण्यास नकार दिला.

यानंतर पेंड्रा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा प्रियकर, प्रेयसी टॉवरवरच होते. त्यांच्यापासून काही फूट अंतरावर हायटेंशन करंट असलेली वायर होती. त्यामुळे खाली जमलेल्या ग्रामस्थांना धडकीच भरली. दोघे वेळीच खाली न उतरल्यास त्यांना करंट लागण्याचा धोका होता.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच तासांनंतर दोघांची समजूत काढण्यात त्यांना यश आलं. दोघे हळूहळू खाली उतरले. दोघे सुखरुप खाली आल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. या प्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. दोघांना समज देऊन सोडण्यात आलं.