म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : आमगाव-देवरी मार्गावरील अंजोरा शिवारात झालेल्या अपघातग्रस्त वाहनातून ४४ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच्या घटनेने जिल्ह्यातील अवैध दारू वाहतुकीचे बिंग फुटले आहे. या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजोरा शिवारात ४ ऑगस्टला रात्री ११.४५ वाजता एका अनियंत्रित वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उलटले. रोवणीसाठी चिखल तयार करण्यात आलेल्या शेतात हे वाहन अडकले. या वाहनात एक जण फसून असल्याची माहिती आमगावचे ठाणेदार युवराज हांडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर आमगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहनात अडकलेल्या लिलेश्वर वर्मा (२४) रा. नवागाव (डोंगरगढ) याला बाहेर काढले. तो गंभीर जखमी असल्याने त्याला आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली.

अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये दारूच्या ४०२ बाटल्या आढळल्या. या दारूची किंमत ४४ हजार २०० रुपये इतकी आहे. या प्रकरणात लिलेश्वर व इतर एक जणाविरुद्ध आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही कारवाई पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक खेडकर, साबळे, शेंडे व रामटेके यांनी केली.