लखनऊ: उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये जेईईची तयारी करत असलेल्या विद्यार्थिनीची विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला आहे. जेईईच्या तयारीसाठी तरुणीनं क्लास लावला होता. क्लासमधून घरी परतत असताना तिचा मृत्यू झाला. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. रस्त्यावर असलेल्या विजेच्या खांब्यातील काही तारा बाहेर आल्या होत्या. या तारांच्या संपर्कात आल्यानं विद्यार्थिनी गंभीर जखमी झाला.आसपासच्या लोकांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. विद्यार्थिनीला मदत करण्यासाठी एक वाटसरु पुढे आला. मात्र त्यालाही करंट लागला. बंथरामधील कृष्णलोक वसाहतीत राहणारे व्यावसायिक विनीत द्विवेदी यांचा सूरतमध्ये कारखाना आहे. त्यांची पत्नी आणि मुलं भाड्याच्या घरात राहतात. विनीत यांची १६ वर्षांची मुलगी इष्टी इंटरची विद्यार्थिनी होती. ती फिनिक्स मॉलजवळच्या आकाश कोचिंगमध्ये जेईईचा अभ्यास करायची.इष्टी शनिवारी दुपारी घरातून क्लासला जाण्यास निघाली. संध्याकाळी साडे सहा वाजता ती क्लासमधून निघाली. तितक्यात जोरदार पाऊस सुरू झाला. काही वेळातच परिसरात पाणी साचलं. इष्टी रस्त्याच्या कडेला असलेल्या पिकॅडली हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेनं निघाली. वाटेत असलेल्या तनिष्क शोरुमच्या समोर एक पथदिवा होता. त्याच्या काही बाहेर आलेल्या होत्या. त्यातू न वीज प्रवाह सुरू होता. तारांमधून बाहेर पडणाऱ्या विजेमुळे इष्टीला करंट लागला.इष्टी घरातील थोरली मुलगी होती. तिला आठ वर्षांचा भाऊ आहे. इष्टीच्या मृत्यूबद्दल समजताच तिची आई बेशुद्ध पडली. नातेनाईवाकांनी तिला कसंबसं सावरलं. त्यानंतर त्या शुद्धीवर आल्या. इष्टीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई न करण्याची आणि शवविच्छेदन न करण्याची भूमिका घेतली. त्यांनी लिखित स्वरुपात अशी मागणी केली. त्यानंतर इष्टीचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here