अहमदनगर : कर्जत तालुक्यात एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिलं. त्यानंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने दोन्ही चिमुकल्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर आरोपी बाप बचावला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात खळबळ माजली आहे.

अनेक आई-वडील आपल्या लेकरांसाठी जीवाचे रान करतात, आपल्या मुलांना जीवापाड जपत असतात, मात्र पोटच्या गोळ्यांना विहिरीत ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अळसुंदा येथे ही घटना घडली.

महिला सरपंचाच्या लेकाने आयुष्य संपवलं, दहावीत शिकतानाच टोकाचं पाऊल, कारण ठरले ‘ते’ दोघं
रविवारी दुपारी पती-पत्नीचा वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात बापानेच आपल्या मुलांना विहिरीमध्ये ढकलून दिलं. त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये बाप वाचला, तर दोन्ही निष्पाप चिमुकले दगावले.

४८ वर्षीय काकूचा शरीरसंबंधांना नकार, २१ वर्षांचा पुतण्या चिडला, मित्रासमोरच धक्कादायक कृत्य
कोणतीही चूक नसताना या चिमुकल्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. ऋतुजा गोकुळ क्षीरसागर (वय ८ वर्ष) आणि वेदांत गोकुळ क्षीरसागर (वय ४ वर्ष) असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

या दोन चिमुकल्यांचा निर्दयी बाप गोकुळ क्षीरसागर यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत असून तो मात्र या घटनेतून वाचला आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. कर्जत पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here