हैदराबाद: घरात मुलाचा जन्म झाला म्हणून सारं कुटुंब आनंदात होतं. पण, काहीच वेळात या आनंदाला नजर लागली. हैदराबादच्या निलोफर रुग्णालयात एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली. या बाळाच्या मृत्यूमागील जे कारण समोर आलं आहे ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या या बाळाच्या अंगावर दुसऱ्या एक रुग्णाचा अटेंडंट भोवळ येऊन पडला आणि त्यामुळे या बाळाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
नामपल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम पुष्पम्मा यांनी दोन दिवसांपूर्वी विकाराबाद येथील परगी शासकीय रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. जन्मावेळी बाळाचे वजन (१.३ किलो) कमी असल्याने कुटुंबीयांनी त्याला चांगल्या उपचारासाठी शहरातील निलोफर रुग्णालयात नेले. या बाळावर उपचार सुरू होते.

बाळ पाळणामध्ये झोपलेले होते. पुष्पम्माने त्याला आपल्या मांडीत घेतले आणि दूध पाजले. त्यानंतर बाळ झोपी गेलं. तेवढ्यात डॉक्टर यायची वेळ झाली. पुष्पम्माने एका हातात बाळाला पकडले आणि दुसऱ्या हाताने फाईल उचलू लागली. यादरम्यान तिला फाईल सांभाळण्यात अडचण येत होती.
त्यामुळे पुष्पम्माने बाळाला जमिनीवर झोपवले आणि फाईलचे कागद व्यवस्थित ठेवू लागली. दरम्यान, याच वॉर्डात दाखल असलेल्या दुसऱ्या रुग्णाची अटेंडंटला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तिला भोवळ येऊन ती बाळावर पडली, असे नामपल्लीचे निरीक्षक बी अभिलाष यांनी सांगितले.
या घटनेत बाळ जखमी होऊन बेशुद्ध पडलं. डॉक्टरांनी तातडीने त्याच्याकडे धाव घेतली, मात्र त्याला वाचवता आले नाही. मुलाची तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.