नांदेड : एकीकडे समाजात वडील-मुलांमध्ये वाद विकोपाला जात असल्याच्या घटना वरच्या वर येताना दिसतात. पिता-पुत्रामधील वादांच्या घटना खूनापर्यंत गेल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मुलीच आपल्या आई-वडिलांना साथ देतात, सांभाळ करतात, तर मुलं आई वडिलांची साथ सोडून आपल्याच संसारात व्यस्त होतात, अशी भावना अनेकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. मात्र या समजाला नांदेडच्या एका २५ वर्षीय डॉक्टर मुलाने फाटा दिला आहे.

जन्मदात्याला स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करुन मुलाने जीवनदान दिले आहे. डॉ मयुरेश गव्हाणे असं या मुलाचं नाव आहे. त्याने समाजापुढे ठेवलेल्या या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

नांदेड शहरातील रहिवासी असलेले डॉ मयुरेश गव्हाणे यांचे वडील गोविंद गव्हाणे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. लोहा तालुक्यातील मारतळा येथील जिल्हा परिषद शाळेत ते कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा मयुरेश याने नांदेड मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केले असून दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करत आहे.

लहान बहिणीचं मोठं मन, कोट्यवधींची संपत्तीही पडेल फिकी; भावासाठी आयुष्यभर पुरणारं दान
मागील काही दिवसा पासून त्यांचे वडील हे आजारी होते. त्यांना यकृतचा आजार होता. नांदेड मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना तात्काळ हैदराबाद येथे जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी तात्काळ त्यांना हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात दाखल केले. तपासणी केली असता यकृत पूर्णपणे खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रियजनांच्या जीवापेक्षा धर्म मोठा नाही, भिन्नधर्मीय महिलांचे एकमेकींच्या कुटुंबीयांना किडनीदान
यकृत न बदलल्यास केवळ एका महिन्यापर्यंतचं ते तग धरु शकतील, असं तेथील डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगतिले. त्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला. यकृत कुठून आणायचे हा प्रश्न कुटुंबियासमोर निर्माण झाला होता.

How To Test Your Liver Health | तुमचं यकृत फिट आहे कि नाही कसं ओळखावं?

ही माहिती डॉ मयुरेशला मिळताच त्याने विलंब न करता थेट दिल्लीहून हैदराबाद गाठले आणि स्वतःच्या यकृताचा भाग दान करण्यास समर्थता दाखवली. डॉक्टरांनी देखील तपासणी करुन अवघ्या २४ तासात यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली अन् यकृतातील काही भागाचे ट्रान्सप्लांट केले.

आई काय काय करते! २४ वर्षांचा मुलगा मरणाच्या दारात, माऊलीनेच लेकराला दुसरा जन्म दिला
संकट काळात मुलाने दिलेल्या आधारामुळे मनोहर गव्हाणे यांना जीवनदान मिळाले आहे. सध्या दोघांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नुकतीच ही शस्त्रक्रिया पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here