छत्रपती संभाजीनगर: पैठण रोड नक्षत्रेवाडी येथील ३५ वर्षीय महिलेने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना रविवार (६ ऑगस्ट) रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दोन मुलींच्या आईने आत्महत्या केल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती जयवंत पागोरे (वय ३५, नक्षत्रेवाडी पैठण रोड) असे गळफास घेतलेल्या महिलेचा नाव आहे. ज्योती यांचे पती जयवंत खाजगी नोकरीला आहे. १४ वर्षांपूर्वी ज्योती यांचा विवाह जयवंत यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. दरम्यान, रविवारी दिवसभर घरीच होते.

दोन दिवसांच्या बाळावर रुग्णाची अटेंडंट पडली अन् बाळाचा दुर्दैवी मृत्यू, पाहून सारेच हळहळले
पतीला रुग्णालयात नेलं अन् घरी येऊन आत्महत्या केली

मात्र, सायंकाळी पतीच्या प्रकृती अस्वस्थामुळे ज्योती आणि जयवंत हे रुग्णालयात उपचारासाठी गेले. उपचार घेऊन घरी परत आल्यानंतर सर्वजण घरी असतानाच ज्योती यांनी घरातच गळफास घेतला. काही वेळाने पतीच्या लक्षात येताच त्यांनी ज्योती यांना तात्काळ खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून ज्योती यांना मृत घोषित केलं.

स्वयंपाक करताना नातवाने आजीला ओढलं, अंगावर डिझेल ओतलं अन्… मन सुन्न करणारी घटना
ज्योती यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार साईनाथ चव्हाण करीत आहेत.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

घरात कुठलाही वाद नाही

घरामध्ये कुठलाही वाद नसताना ज्योती यांनी आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे दोन मुलींच्या डोक्यावरील आईचे छत्र हरवलं असल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here