पुणे: पुणे – नाशिक मार्गालगत घाटात एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना समोर आली आहे. मात्र, त्याचा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. हा तरुण हिंजवडी आयटी पार्क येथे कंपनीत अभियंता म्हणून कामाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. खेड पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सौरभ नंदलाल पाटील (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. २८ जुलैपासून हा तरुण बेपत्ता होता. मात्र, रविवारी त्याचा मृतदेह खेड घाटात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत सौरभ याचे नातेवाईक संदीप सोनावणे यांनी हिंजवडी पोलिसात हरविल्याची तक्रार देखील दिली होती. मात्र, त्याचा मृतदेह पुणे – नाशिक महामार्गालत असलेल्या सांडभोरवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या शेतात आढळला आहे. सरकार तर्फे सहायक पोलिस निरीक्षक बिरुदेव काबुगडे यांनी फिर्याद दिली आहे.

ना भांडण, ना कुठली अडचण, घरात सगळे असताना महिलेने आयुष्य संपवलं, लेकींची अवस्था पहावेना
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सौरभ पाटील हा हिंजवडी आयटी पार्क येथील एका कंपनीत कामाला होता. मात्र, गेल्या आठवडा भरापासून तो बेपत्ता होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. अखेर नातेवाईकांनी हिंजवडी पोलिसात तो हरविल्याची तक्रार दाखल केली. त्याची दुचाकी ही खेड तालुक्यातील होलेवाडी परिसरात आढळली होती. तसेच, त्याची चावी जवळ असलेल्या विहिरीच्या कठड्यावर आढळली होती. मात्र, तरी देखील त्याचा शोध कुठे लागत नव्हता.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

अखेर पुणे – नाशिक माहामर्गवर असलेल्या सांडभोरवाडी जवळ असलेल्या जुन्या खेड घाटात वन विभागाच्या हद्दीत उतरत्या झाडाझुडपांचे वाढलेल्या गवतातील शेतात सौरभ पाटील यांचा कुजलेल्या अवस्थेत मृत्यदेह आढळला आहे. खेड पोलिसांकडून तपासाची सूत्रे हालवली जात असून या सापडलेल्या मृतदेहाच्या मृत्यूचा तपास करण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती खेड पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दोन दिवसांच्या बाळावर रुग्णाची अटेंडंट पडली अन् बाळाचा दुर्दैवी मृत्यू, पाहून सारेच हळहळले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here