सांगली: ‘सांगलीतील मृत्यूदर ४.१० टक्क्यांवर गेला आहे. रुग्णांना खाटा मिळत नाहीत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी आठ-दहा रुग्णालयांमध्ये फिरावे लागते. या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारने अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबतही रुग्णांसह रुग्णालयांच्या तक्रारी वाढत असल्याने सरकारचे दुर्लक्ष स्पष्ट होत आहे,’ अशी टीका विरोधी पक्षनेते यांनी केली. ते सांगलीत करोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी काल, शुक्रवारी इस्लामपूर येथील करोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज, शनिवारी आणि मिरजेतील करोनास्थितीचा आढावा घेतला. यानंतर बोलताना ते म्हणाले, ‘सांगलीत ऑक्सिजनयुक्त खाटांची कमतरता आहे. व्हेंटिलेटर पुरेसे नाहीत. कोव्हिड डेडिकेटेड सेंटरमध्ये रुग्णांना वेळेत प्रवेश मिळत नाही. प्रशासन हतबल होत असल्याने सरकारला अधिक लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. सांगलीतील वाढलेला रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकारने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करावी.’

वाचा:

महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीवरूनही फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘या योजनेंतर्गत उपचार मिळणाऱ्या रुग्णालयांची यादी सरकारने जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र रुग्णांना या योजनेतून मोफत उपचार मिळत नाहीत. सरकारकडून पैसे मिळत नसल्याच्या रुग्णालयांच्या तक्रारी आहेत. रेमडेसिव्हरसारखे महागडे औषध सर्वसामान्यांना कसे परवडणार? अशी औषधे सरकारने उपलब्ध करावित, अन्यथा रुग्णांचा मृत्यूदर वाढण्याचा धोका आहे.’ यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, आदी उपस्थित होते.

मानसिक आधारासाठी मंदिरे उघडण्याची गरज

राज्य सरकारने दारुची दुकाने उघडली. मॉल्स सुरू केले. पण, धार्मिक स्थळे उघडली नाहीत. देशातील सगळ्या राज्यांनी धार्मिक स्थळे उघडली, पण महाराष्ट्राची भूमिका अजब आहे. दारुची दुकाने उघडण्यात जेवढा उत्साह दाखवला, त्यापेक्षा किमान अर्धा उत्साह धार्मिक स्थळे उघडण्यासाठी दाखवावा. लोकांना मानसिक आधाराची गरज असल्याने राज्य सरकारने तातडीने मंदिरांचे दरवाजे उघडावेत, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here