बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या भंडारी येथील शेतकरी शैलेंद्र बिल्लारे या शेतकऱ्याने आपल्या साडेचार एकर शेतात लावलेल्या कपाशीमध्ये ट्रॅक्टर घालून कपाशी नष्ट केलीय. खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि इतर तालुक्यात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीची वाढ थांबली. परिणामी त्याला आता फळे सुद्धा येत नाहीत. त्यामुळे कपाशीवर लाखो रुपये करून काहीही हाती लागणार नसल्याने शेतकरी आता मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांनी कपाशी उपटून टाकली तर काहींनी ट्रॅक्टर किंवा जनावरे घातली.
खामगाव तालुक्यात येणाऱ्या भंडारी येथील शेतकरी शैलेंद्र बिलारे यांनी सुद्धा आपल्या साडेचार एकरामध्ये कपाशी लावली होती. लाखो रुपये त्यावर खर्च केलाय, कपाशी जोमात असताना त्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला परिणामी कापशीवर रोटा फिरवावा लागला. त्यांचं लाखोंचे नुकसान झालंय.

एकीकडे असमानी सुलतानी संकटाला तोंड देण्याकरता बळीराजा नेहमी तयारच असतो. पण यावर्षी बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखाली झालेला ढगफुटीसदृश्य पावसाने तो सावरलेला नसताना आता पिकावर आलेला हा रोग त्याच्या चिंतेमध्ये भर टाकत आहे.
संकटामागोमाग संकट त्याची पाठ काही सोडत नाही आहे. आणि त्यामुळे आता मायबाप सरकार यावर कसा मार्ग काढतो कारण सरकार आपल्या दारी उपक्रम राबवत असताना नुसतं कार्यक्रमापुरतेच मदतीचा देखावा न होता. थेट बळीराजापर्यंत मदत कसं पोहोचू शकते याचे नियोजन करणे गरजेचे आहे.