चंद्रपूर : एका अत्याचार पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये विष घेतल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्हात उघडकीस आली आहे. या घटनेने पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासन हादरले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चौरे यांच्यावर कार्यवाही करावी ही मागणी घेत पीडितेने विष घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत पीडित महिलेचे गाव येते. पीडित महिला अंदाजे ३६ वर्षांची आहे. तिने ऑक्टोबर २०२२ मध्ये आरोपी इरफान शेख विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीवर ३७६ आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

मात्र, या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाल्यावर आरोपी आणि त्यांचे नातलग त्रास देत असल्याचा पीडित महिलेचा आरोप होता. सोबतच आरोपींना वरोरा पोलीस स्टेशनचे API निलेश चौरे मदत करत असल्याचा देखील महिलेने आरोप केला आहे. आरोपींना मदत करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक (API) निलेश चौरे यांच्यावर कारवाई करण्याची महिलेने शनिवारी वरोरा येथे प्रेस कॉन्फरन्स घेत मागणी केली होती. मात्र API चौरे यांच्यावर कारवाई न झाल्याने महिलेने वरोरा पोलीस स्टेशन मध्ये विष प्राशन केले.
महिलेला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. या धक्कादायक घटनेने जिल्हा हादरला आहे. पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.