रायगड: महाड तालुक्यात शिवाजी वाळण कोंड येथे १९ वर्षाचा मुलगा धबधब्यात बुडाल्याची घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. एकूण ७ मुले पोहण्यासाठी गेले होते. त्यातील एक मुलगा बुडाला. स्मित घाडगे हा मुलगा त्याच्या सख्या मोठ्या भावाला वाचवण्यासाठी गेला होता, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो स्वतः पाण्यात बुडाला.
भोंगळ कारभार! रस्ता चिखलाने माखलेला; स्कूल व्हॅन अचानक बंद, शालेय विद्यार्थी उतरले खाली अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले १६ ते २० वयोगटातील होती. बाकी सहा मुले सुखरूप आहेत. शिवाजी वाळणमध्ये जंगलात एक तास पायी चालत अॅडव्हेंचर सॉउल संस्थेच्या १२ सदस्यांनी तिकडे जाऊन बचाव कार्य केले. ह्या बचाव कार्यात कुमार केंद्रे, यश पवार, समीर विचारे, विशाल खाबे, अमित गाडगीळ, संकेत मालक, चंद्रकांत सावर्टकर, प्रसाद देवरूखर, प्रवीण सपकाळ, रोशन सावंत, व्यंकोजी लुष्टे या सदस्यांनी मेहनत घेतली. या घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती आंधळे करत आहेत.

हिंदू-मुस्लीम बैठ के खाये थाली में एैसा हिंदुस्तान बना दे वल्ला’ गाणं म्हणणाऱ्या मौलानाचा बळी

महाड तालुक्यातील दहिवड गावचा रहिवासी असणारा स्मित घाडगे हा वीस वर्षीय युवक जवळच असणाऱ्या शिवाजी वाळण कोंड येथील धबधब्यावर गावातील अन्य सात मुलांबरोबर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा मोठा भाऊ देखील त्याच्याबरोबर होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या सोबत असणाऱ्या सात मुलांपैकी स्मित घाडगे या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिवाजी वाळण कोंड येथील धबधब्यावर दुपारी बाराच्या सुमारास घडली. शिवाजी वाळण कोंड येथील निर्जनस्थळी असणाऱ्या धबधब्यावर पोहायला गेलेले दहिवड गावचे हे युवक पाण्यात पोहता असताना स्मित घाडगे याचा मोठा भाऊ हा पाण्यात बुडत होता. आपल्या मोठ्या भावाला वाचवताना घाडगे याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने दहिवड गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here