मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल सातत्याने चर्चेत आहे. कधी तांत्रिक बिघाड तर कधी प्रवाशांच्या गर्दीमुळे होणारा उकाडा; तसेच प्रवासी लटकत असल्याने दरवाजे बंद न झाल्याने होणारा लोकल खोळंबा असे प्रकार घडत असतानाच सोमवारी एसी लोकलच्या छतातून चक्क पाणी गळू लागले.
विरार-चर्चगेट एसी लोकलमधील एका डब्यात सकाळी सव्वासातच्या सुमारास गळतीमुळे पाण्याची धार लागली होती. विरारहून लोकल निघाल्यावर थेंब थेंब गळणारे पाणी बोरिवलीपर्यंत संततधारेच्या रूपात बरसू लागले. पाऊस नसताना लोकलमध्ये पाणी साचू लागल्याने प्रवासी हैराण होते. कृष्णा दरगर प्रवाशाने याची व्हिडीओसह माहिती प्रसारित करीत पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना टॅग केले. त्यानंतर पश्चिम रेल्वेने व्हिडीओची तपासणी सुरू केली.

पाणीगळतीची तक्रार बोरिवली स्थानकात प्राप्त झाली. त्यानंतर ही लोकल अंधेरी स्थानकात दाखल होताच याबाबतची दुरुस्ती हाती घेण्याच्या सूचना रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. ही जलद लोकल असल्याने अंधेरी स्थानकात थांबा होता. दरम्यान सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास छताची पाहणी केली असता कम्प्रेसरमधून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले.
कम्प्रेसरमधील पाणी डब्याबाहेर जाण्याची व्यवस्था आहे; मात्र तांत्रिक बिघाडामुळे छतातून पाणी डब्यात पडत होते. अंधेरीमध्ये लोकलमधील कम्प्रेसर बंद केल्यानंतर पाणी गळणे थांबले. दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने डब्याची स्वच्छता करण्यात आली. यामुळे लोकल काही मिनिटे विलंबाने धावत होती, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.