पुणे : पुण्यातून सुटणाऱ्या ‘पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस’बरोबरच आता ‘झेलम एक्स्प्रेस’चे वेळापत्रकही बिघडले आहे. गेल्या आठवड्यापासून झेलम एक्स्प्रेस दररोज काही तास उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुण्यातून सुटणाऱ्या हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसचे गेल्या तीन महिन्यांपासून वेळापत्रक बिघडले आहे. ही गाडी कधी रद्द होते, तर बहुतांश वेळा ती उशिराने धावत आहे. आता पुण्यातून सुटणारी ‘झेलम एक्स्प्रेस’ ही देखील गेल्या आठ दिवसांपासून उशिराने धावत आहे. झेलम एक्स्प्रेस दररोज पुणे रेल्वे स्थानकावरून सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी सुटते. ती दोन हजार १७९ किलोमीटर अंतर पार करून तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी जम्मू तावी येथे पोहचते; पण ३१ जुलैपासून या गाडीचे वेळापत्रक बिघडल्याचे दिसून येत आहे. या एक्स्प्रेसला दररोज पाच ते सात तास उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ताटकळत थांबावे लागत आहे. प्रवास करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला असतात. त्यांचे खूपच हाल होत आहेत. त्यामुळे ही गाडी वेळेवर सोडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

सांगूनही ऐकलं नाही, पोलिसांनी कायद्याचा दणका दिलाच, आता पुणेकरांचे पाय आपोआप पोलीस स्टेशनकडे!
‘हावडा’मुळे ‘झेलम’चे वेळपत्रक बिघडले

गेल्या तीन महिन्यांपासून हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसचे वेळापत्रक बिघडले आहे. या गाडीचे चार ‘रेक’ धावत असतात. तरीही ही गाडी रद्द करण्याची वेळ कधी-कधी येत आहे. गेल्या आठवड्यात हावडा एक्स्प्रेस रद्द झाल्यामुळे तिचा ‘रेक’ पुण्यात आला नाही. गाडी रद्द होऊ नये म्हणून ‘झेलम’चा ‘रेक’ हावडासाठी देण्यात आला. तेव्हापासून ‘झेलम’चेदेखील वेळापत्रक बिघडल्याचे दिसून येत आहे.

झेलम एक्स्प्रेस आणि आझाद हिंद एक्स्प्रेसचे रेक ‘फर्स्ट-कम-फर्स्ट-यूज’ तत्त्वावर वापरले जात आहेत. आझाद हिंद एक्स्प्रेस रद्द होऊ नये किंवा सुटण्यास खूप जास्त उशीर होऊ नये, यासाठी हे केले जात आहे. या गाड्या दररोज वेळेवर कशा चालवता येतील, यावर आम्ही विचार करीत आहोत.

– डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग

सर्वसामान्यांचे हाल; डाळींच्या उत्पादनात येणार तूट, तुटीमुळे टंचाई निर्माण होण्याची शक्यता, आकडेवारी समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here