मुंबई : आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीतील कंपन्यांचे निकाल जाहीर करण्याच्या हंगामाने वेग पकडला आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने दोन आठवड्यांपूर्वी निकाल जाहीर केले असून आता या महिन्याच्या शेवटी भागधारकांची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. प्रस्तावित एजीएमपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२२-२३ चा वार्षिक अहवाल जारी केला आहे. यामध्ये कंपनीने अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासह अनेक उच्च अधिकाऱ्यांच्या पगाराचा तपशील दिला आहे. याशिवाय कंपनीने सरकारला दिलेला कर आणि लोकांना दिलेल्या रोजगाराच्या संधींचीही माहिती दिली आहे.

तीन वर्षात इतके लाख कोटी जमा
वार्षिक अहवालानुसार, यावेळीही रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक करदाता आहे. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजने कर म्हणून सरकारी तिजोरीत १.७७ लाख कोटी रुपयांचे योगदान दिले असून यापूर्वी २०२१-२२ या आर्थिक वर्षात कर म्हणून १.८८ लाख कोटी रुपये जमा केले होते. कंपनीने गेल्या तीन वर्षांत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, स्पेक्ट्रम शुल्क इत्यादींसह ५.६५ लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले आहेत.

रिलायन्सच्या नव्या पिढीचं रिपोर्ट कार्ड; कोणी मारली बाजी, कुणाच्या झोळीत सर्वात नफा घ्या जाणून
मुकेश अंबानी अजून पाच वर्षे काम करतील
रिलायन्स इंडस्ट्रीजची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी २१ जुलै रोजी कंपनीने जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. आता कंपनीने आपला नवीनतम वार्षिक अहवाल एजीएमपूर्वी जारी केला आहे. मुकेश अंबानी यांची पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर कंपनीने भागधारकांकडून मंजुरीही मागितली आहे.

रिलायन्सच्या ३६ लाख गुंतवणूकदारांसाठी मोठी खुशखबर, शेअरचे नवे टार्गेट पाहून बसेल धक्का
तिसऱ्या वर्षीही अंबानींचा पगार शून्य
मुकेश अंबानी अनेक दशकांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय सांभाळत आहेत. एजीएममध्ये भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांची २०२९ पर्यंत कंपनीचे सीएमडी म्हणून नियुक्ती केली जाईल. अंबानी त्यांच्या कार्यकाळात पगार घेणार नाहीत. कोविड महामारीनंतर मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सीएमडीची जबाबदारी स्वीकारण्याच्या बदल्यात कोणतेही पगार घेत नाहीत. गेल्या वर्षीही त्यांनी पगार घेतला नाही. अशा प्रकारे ते सलग तीन वर्षे शून्य पगारावर काम करत आहेत.

अंबानींच्या स्टॉकमध्ये खरेदी वाढली, १६ रुपयांच्या शेअरमध्ये ‘पॉवर’; फायद्याचं गणित काय?
एक लाख नोकऱ्या
कंपनीने अहवालात म्हटले की, २०२२-२३ या आर्थिक वर्षात ९५ हजार १६७ नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. अशाप्रकारे रिलायन्स इंडस्ट्रीजही नोकऱ्या देण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिली. आता रिलायन्समधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ३.८९ लाख झाली आहे. यापैकी २.४५ लाखांहून अधिक कर्मचारी रिलायन्स रिटेलमध्ये तर ९५ हजारांहून अधिक लोक रिलायन्स जिओमध्ये काम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here