छत्रपती संभाजीनगर : मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दुहेरी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र त्या पूर्वी रेल्वे विभागाने जुन्या रूळांची देखभाल करून ते अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. ताशी १३० किलोमीटर रेल्वे चालविण्यासाठी देशभरातील विविध भागात रेल्वेमार्गांवर वेग वाढविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. या अंतर्गत मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या मार्गाचा समावेश करण्यात आल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार यांनी दिली.

देशभरात सध्या चालत असलेल्या रेल्वेचा वेग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गावरून ताशी १०० किलोमीटर वेगाने रेल्वे वाहतूक करू शकतात. काही रेल्वे त्या वेगाने चालविण्यात येत आहेत. तर काही रेल्वेचा वेग हा थांबे आणि समोरून येणाऱ्या रेल्वेच्या वाहतुकीमूळे कमी होतो. मात्र या मार्गावर आगामी काही दिवसांत रेल्वेचा वेग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियोजित कामांसाठी रेल्वे विभागाने रोलिंग बॅकअंतर्गत विविध कामांची सुरवात केली आहे. या अंतर्गत काही ठिकाणी रूळ बदलले जाणार आहेत. शिवाय काही ठिकाणी साइडलाइन किंवा लूप लाइन तयार करण्याचे नियोजीत करण्यात आले आहे. अशा विविध कामांशिवाय सिग्नलिंगचेही काम केले जाणार आहे.

आमच्यात वादही नाही, गटही नाही, पक्ष एकसंध आहे, शरद पवारांनी निवडणूक आयोगाला काय सांगितलं?
छत्रपती संभाजीनगर ते मनमाड मार्गावर रेल्वेचा वेग ताशी १३० किलोमीटर करण्यासाठी विविध कामे केली जात आहेत. ती डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण केली जाणार आहे. या मार्गावरील रेल्वेचा वेग वाढल्यास, छत्रपती संभाजीनगरहून उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेची प्रवासी वाहतुकीचा वेळही कमी होईल. याशिवाय मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेही वेगात जाणार आहेत, अशीही माहिती सरकार यांनी दिली.

आवश्यक सुविधा होणार उपलब्ध

रेल्वेची गती वाढविण्याबरोबरच आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहेत. हेवी रेल, याशिवाय २६० मीटरचे वेल्डेड रेल, पॅनेल्स घालणे, तसेच अन्य सुविधाही उभारल्या जाणार आहेत.

संभाजी भिडेंना धक्का आणि दिलासाही; नवी मुंबईत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल तर हायकोर्टातील याचिकेतून नाव वगळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here