म. टा. प्रतिनिधी, पुणे: पत्नीचा बुद्ध्यांक कमी आणि ती सूज्ञ नसल्याचे लक्षात आल्यानंतर पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा न्यायालयाने मान्य करीत, घटस्फोटाला मंजुरी दिली. राघव आणि रागिनी (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. त्यांचे सहा जुलै २०२१ रोजी लग्न झाले होते. अवघ्या दोन वर्षांतच या जोडप्याचा संसार संपुष्टात आला.

लग्नानंतर काही दिवसांतच रागिनी यांना घरातील कोणतीही कामे जमत नसल्याचे राघवच्या लक्षात आले. त्यावर राघवने पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तिला चुका दाखवून देऊन सुधारणा करण्यास सांगितले. मात्र, रागिनीमध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसून आले. एके दिवशी रागिनीने घरातील गॅस सुरू ठेवला होता. तो शेजारच्यांनी घरात येऊन बंद केला. अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या चुका ती सतत करीत होती. त्यामुळे शंका आल्याने राघवने रागिनीची बुद्ध्यांक चाचणी करून घेतली. त्यातून रागिनी सुज्ञ नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. रागिनीला बऱ्याच गोष्टी कळत नसल्याचे निदर्शनात आले. रागिनीवर उपचार करण्याची आवश्यकता होती. मात्र, तिच्या आर्इ-वडिलांनी मुलीच्या उपचारासाठी येण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांनी पत्नीपासून घटस्फोट मिळण्यासाठी ॲड. रितेश भूस्कडे यांच्यामार्फत येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.

बायको म्हणाली, मी त्याला संपवलं! नवरा दीड वर्षांनी जिवंत सापडला, कहाणी ऐकून सारेच चक्रावले

शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे राघव यांनी दाखल केलेल्या दाव्यात नमूद केले. या दाव्याच्या सुनावणीला पत्नी हजर झाली नाही. त्यामुळे न्यायालयाने एकतर्फी आदेश दिला. ‘पत्नीने राघव यांना क्रुरतेची वागणूक दिली. त्यामुळे ते घटस्फोट मिळण्यास पात्र आहे,’ असे नमूद करून न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here