मुंबई : सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांतच बँकांचे कामकाज असावे आणि बँक कर्मचाऱ्यांना प्रत्येक शनिवारी सुट्टी मिळावी ही कल्पना आता लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. याविषयी जवळजवळ वर्षभर विविध बँक कर्मचारी संघटनांनी पाठपुरावा केला होता. इंडियन बँक्स असोसिएशनच्या (आयबीए) २८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा हा प्रस्ताव मांडला गेला होता. यावर चर्चा होऊन अखेर हा प्रस्ताव आयबीएने मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. मंत्रालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर पाच दिवसांचा आठवडा अर्थात प्रत्येक शनिवारी सुट्टी बँक कर्मचाऱ्यांना लागू होईल.

Bank Locker: लॉकरची चावी हरवली तर काय? डुप्लिकेट चावी मिळणार की लॉकर तोडावे लागेल?
वरील प्रस्ताव आयबीएच्या बैठकीत मांडला गेल्याचे संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले आहे. बँक कर्मचारी संघटनांनी हा प्रस्ताव २८ जुलै रोजीच्या बैठकीत मांडला. हा प्रस्ताव आयबीएने मंजूर केल्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडूनही याला मंजुरी मिळाल्यास बँकांना पाच दिवसांचा आठवडा लागू होईल. मात्र यासाठी बँक शाखांमधील दैनंदिन कामकाज ४५ मिनिटांनी वाढण्याची शक्यता आहे. याविषयी आयबीएकडून ईमेलद्वारे माहिती प्रसारित केली गेली नसली तरी, खासगी व सरकारी बँकांच्या उच्चपदस्थांकडून याला दुजोरा देण्यात आला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून याला मंजुरी मिळेल, असा विश्वासही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एकापेक्षा जास्त बँक खाती उघडलीत? वेळीच सावध व्हा… मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता
सध्या देशातील बँक शाखा दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सुरू आहेत. बँकांना दुसरा व चौथा शनिवार सुट्टी मंजूर केली गेली आहे. सन २०१५पर्यंत आठवड्याचे सहाही दिवस बँका सुरू असायच्या. पाच दिवसांचा आठवडा केल्यास दरदिवशी कामाची वेळ ४० मिनिटांनी वाढवली जाईल. यामध्ये बँक शाखेत रोखीचे व्यवहार सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत होतील. त्यानंतर बिगर रोखीचे व्यवहार दुपारी ४ ते ४.३० या वेळात होतील, असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने सांगितले आहे.

ऑगस्टमध्ये सणच सण! १४ दिवस बंद राहणार बँका; खोळंबा टाळण्यासाठी आधीच वाचा सुट्ट्यांची यादी
डिजिटल व्यवहारांमुळे मागणी?
बँकिंग क्षेत्रात ७० टक्क्यांहून अधिक दैनंदिन कामकाज रोखीने होत असे. त्यावेळी सप्ताहातील सहा दिवस बँका सुरू ठेवणे आवश्यक होते. परंतु आता ८० टक्क्यांहून अधिक बँकिंग व्यवहार डिजिटली केले जात आहेत. यामध्ये नवे खाते उघडणे यासारखे व्यवहारही ऑनलाइन होत आहेत. केवळ काही सह्यांसाठीच ग्राहकांना बँक शाखेत बोलावले जात आहे. त्यामुळे बँक शाखेत येऊन प्रत्येक व्यवहार करण्याची गरज आता राहिलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here