सोलापूर: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आषाढी वारीत पंढरीच्या दर्शनाचे औचित्य साधून सोलापुरातील राजकीय वातावरणात ढवळाढवळ केली आहे. शहरातील पूर्व भाग,उत्तर सोलापूर मतदार संघानंतर केसीआर यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात धनगर समाजाचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे केसीआर यांनी धनगर समाजाच्या नेत्यांना हैदराबाद येण्याचे आमंत्रण दिले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सचिन सोनटक्के यांनी जवळपास ६० वाहनांचा ताफा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावच्या सरपंचाना अशा एकूण ३५० जणांना घेऊन सोमवारी सकाळी हैदराबादकडे रवाना झाले आणि बीआरएस पक्षात प्रवेश केला. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३८ गावातील विद्यमान सरपंच, १२ माजी सरपंच, १२ ग्रामपंचायत सदस्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदार संघातील सरपंच व नेते बीआरएसच्या पक्षात गेल्याने भाजपला जबरदस्त हादरा बसला आहे.

गुलाबी वादळ भाजप आमदाराच्या मतदारसंघावर घोंगावत आहे

तेलंगाणा राज्यातील गुलाबी वादळ सोलापुरात दाट होत चालले आहे.पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या बीआरएस प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राजकीय वातावरणात मोठे बदल झाले आहे . शहरातील पद्मशाली समाजाने केसीआर यांना मोठा पाठिंबा दिला. हे गुलाबी वादळ भाजप आमदार सुभाष देशमुखांच्या मतदारसंघावर घोंगावत आहे. विविध गावचे सरपंच आणि कार्यकर्ते असे एकूण ३५० जण ६० गाड्याचा ताफा घेऊन हैदराबादकडे गेले आणि बीआरएस पक्षात प्रवेश केला.

पहिल्यांदा नाराज हेरले, पक्षात घेतले, आता ‘फोकस’ लोकांवर, BRS कामाला लागली!

आगामी काळात येणाऱ्या सर्वच निवडणूक बीआरएस पक्ष लढवणार

आगामी काळात सोलापुरात होणाऱ्या सर्वच निवडणूका बीआरएस पक्ष लढवणार असल्याची माहिती सचिन सोनटक्के यांनी बोलताना दिली.दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकरी वर्ग, मतदार हे विद्यमान भाजप आमदराला वैतागलेला आहे.बीआरएस हा पक्ष शेतकऱ्यांसाठी अनुकूल पक्ष आहे,असे सचिन सोनटक्के यांनी सांगितले.,ग्रामपंचायत , जिल्हा परिषद,महानगरपालिका,विधानसभा ,लोकसभा या सर्वच निवडणूकीत बीआरएस संपूर्ण ताकदीने उभारणार आहे .त्याचीच पूर्वतयारी करण्यासाठी बीआरएस पक्ष सोलापुरात वज्रमुठ बांधत आहे.

आता घेणार अपमानाचा बदला; भाजपच्या दोन माजी आमदारांनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला, BRS कडून लढवणार निवडणूक

दक्षिण सोलापुरातील विविध गावाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याने राजकीय गणित बदलणार

आगामी विधानसभा निवडणुकांचे उद्दिष्ट समोर ठेवून धनगर समाजाचे नेते सचिन सोनटक्के यांनी बीआरएस पक्षाचा प्रचार सुरू केला आहे.सचिन सोनटक्के यांनी यापूर्वी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप कडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती.मात्र या निवडणुकीत पराभव झाला होता.बीआरएस पक्षा तर्फे उमेदवारी मिळाली तर दक्षिण सोलापूर तालुक्यात आमदरकीला भाजपच्या सुभाष देशमुख विरोधात निवडणूक लढवणार असल्याची माहिती सचिन सोनटक्के यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात बोलताना दिली होती.सचिन सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३८ गावातील विद्यमान सरपंच, १२ माजी सरपंच, १२ ग्रामपंचायत सदस्यांनी व विविध कार्यकर्त्यांनी असे एकूण ३५० जणांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. भाजपच्या मतदार संघातील गावं बीआरएस पक्षात जात असल्याने भाजपच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत मोठी कसरत करावी लागणार हे मात्र नक्की आहे.

शेट्टींनी टाळी नाकारली, रघुनाथदादांनी संधी साधली, केसीआर यांना नवा भिडू मिळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here