धुळे: धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी शिरले असल्याचा फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचा थरार यावेळी धुळेकरांनी अनुभवला. मात्र हे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र यावेळी दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीलाच एका नागरिकांनी चोप दिला. यावेळी चोप देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले.

बसमध्ये अतिरेकी घुसतात तेव्हा…

धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात दोन बंदूकधारी दहशतवादी शिरले असून त्यांनी चौघा भाविकांना ओलीस ठेवले आहे अशा माहितीचा फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात वाजला नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला सतर्क केले काही वेळातच शहरातून सायरन वाजवीत पोलिसांची वाहने मंदिराजवळ पोहोचली. मंदिर परिसरात यावेळी एकच धावपळ उडाली मंदिरात शिरलेल्या दहशतवाद्यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन चौघा भाविकांची सुखरूप सुटका केली. हा सगळा थरार धुळेकर नागरिकांनी काल सायंकाळी अनुभवला. मात्र, हे पोलिसांचे मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

काळाराम मंदिरात अतिरेकी घुसतात तेव्हा!

दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून करावयाच्या प्रमाणित कार्यपद्धतीची ही रंगीत तालीम पोलिसांनी अत्यंत उत्कृष्टपणे यावेळी केल्याचे पाहायला मिळाले, मात्र या सगळ्या थरारा दरम्यान स्वामीनारायण मंदिरात राडा झाल्याचे देखील दिसून आले, यावेळी या सगळ्या थरारात दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्याला एका नागरिकाने मजबूत चोप दिला, हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी स्वामीनारायण मंदिराच्या कॅन्टीन परिसरात नागरिक कुटुंबीय समवेत बसले असताना दहशतवादी आत शिरताच त्यांनी केलेल्या बंदुकीच्या फायरिंगच्या आवाजामुळे काही महिला आणि लहान मुले प्रचंड घाबरली होती. यामुळे या संतप्त झालेल्या नागरिकाने दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्यालाच चोप दिला. या चोप देणाऱ्या नागरिकाला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेत हे ट्रेनिंगचा एक भाग असल्याचे सांगत ताब्यात घेतले.

काळ्या काचांच्या ११५ वाहनांवर कारवाई अन् हजारोंचा दंड, बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांनी धडा शिकवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here