पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाला आहे. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ ऑगस्ट पासून शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादीतून फुटलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात शरद पवार सभा घेणार असल्याची माहिती आहे.

त्यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्यात शरद पवार यांनी विशेष रणनीती आखली असून ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुणे शहरात शरद पवार जाहीर सभा घेणार आहेत. आज दिल्लीमध्ये शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना पुणे शहरात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर सभा घेणार असल्याची वेळ दिली आहे.

पुणे शहरासाठी विशेष रणनीती

पुणे शहरात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. वडगाव शेरी मतदारसंघात सुनील टिंगरे तर हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यापैकी सुनील टिंगरे यांनी अजित पवार यांना समर्थन दिले असून चेतन तुपे यांचा निर्णय मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचे पुणे शहरातील दौरे वाढत आहेत. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेले पुणे शहर हे शरद पवार यांच्या हातातून जातंय की काय अशी शंका उपस्थित होत असतानाच शरद पवारांनी पुणे शहरासाठी आता विशेष रणनीती आखली असून ते ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत शरद पवार यांच्या निशाणावर नक्की कोण असणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.

आमच्यात वादही नाही, गटही नाही, पक्ष एकसंध आहे, शरद पवारांनी निवडणूक आयोगाला काय सांगितलं?
दादांना घेरण्यासाठी शरद पवार मैदानात

येणारी लोकसभा निवडणूक त्याचप्रमाणे महापालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरावर लक्ष केंद्रित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दौरे पुणे शहरात वाढले आहेत. त्याचबरोबर अजित पवार हे देखील पुणे शहरात आता प्रत्येक आठवड्याला बैठक होईल असं सांगत आहेत. त्यानंतर आता स्वतः शरद पवार हे मैदानात उतरले असून त्यांनी देखील पुणे शहरावर लक्ष केंद्रित केल्याचा दिसत आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार या दोघांचाही पुणे शहरावर होल्ड असताना पुणे शहर राष्ट्रवादी नक्की कोणाची साथ देणार हे शरद पवार यांच्या सभेनंतर स्पष्ट होईल.

शिवसेनेत फूट पडली, तरीही एकनिष्ठ राहिले, वर्षभरानंतर ‘वऱ्हाड’ ठाकरेंवर रूसलं, शिंदेंना यश!
भाजपसोबत जायचं नाहीच, पवारांचा इरादा पक्का, दादांना धक्का देण्यासाठी काका सज्ज

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर आले होते परंतु ते सामाजिक ट्रस्टचा कार्यक्रम असल्याने त्याविषयी मोठी चर्चाही झाली परंतु कुठलेही भाष्य या दोन्ही नेत्यांनी त्यावेळेस केलं नव्हतं. परंतु गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांचीच अजित पवार यांच्या बंडाला साथ आहे अशी राजकीय चर्चा आहे. परंतु शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम असून ते विरोधकांच्या इंडिया या आघाडी सोबत असून ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीची मुंबईमध्ये बैठक होत असून याचं संयोजकपद शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आहे. त्यापूर्वीच शरद पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले असून १७ ऑगस्टला ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तर शेवटी आठवड्यामध्ये ते पुण्यात जाहीर सभा घेतील अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे. या सभेची तारीख निश्चित झाली नसली तरी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शरद पवार यांची तोफ पुणे शहरात धडा असून त्यांच्या निशाण्यावर नक्की कोण असणार याकडे लक्ष लागले आहे.

जयंत पाटील शरद पवारांकडेच होते, अमित शाहांना भेटलेच नाहीत; अजित पवारांचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here