नागपूर : शांतीनगर पोलिस स्टेशन हद्दीतील तुलसीनगर परिसरातील जैन मंदिरासमोरून दिवसाढवळ्या तीन वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली. शांतीनगर पोलिसांनी मुलाचे वडील व साथीदाराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलासह तिघांचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगरमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचे २०१९ मध्ये मध्य प्रदेशातील खंडवा येथील युवकासोबत लग्न झाले. लग्नानंतर पती व त्याचे नातेवाईक तरुणीचा शारीरिक छळ करायला लागले. तरुणीने खंडवा पोलिसांत तक्रार दिली. काही महिन्यांपूर्वी तरुणी तीनवर्षीय मुलासह माहेरी आली. यादरम्यान पतीने तिला घटस्फोटासाठी नोटीस पाठवली.

जयंत पाटील तुमच्यासोबत येणार आहेत का? पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादा खवळले
बापाने स्वत:च्याच लेकराचं अपहरण केलं

महिनाभरापूर्वी पतीने तरुणीच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘मी मुलाला घेऊन जाईल’, असे म्हटले. सोमवारी सकाळी तरुणी मुलासह मोपेडने जात होती. जैन मंदिरासमोर पती व त्याचे साथीदार कारने आले. एकाने मोपेड अडविली. मुलाला बळजबरीने कारमध्ये बसविले व कारने तिघेही पसार झाले. महिलेने शांतीनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस तिघांचा शोध घेत असून एक पथक खंडवाकडे रवाना झाले आहे.

सुरजागड लोहखाणीत अपघात, तरूण अभियंत्यासह तिघा जणांचा दुर्दैवी अंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here