पंथाचौक परिसरात सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने रात्री नाकाबंदी केली होती. या नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात होती. यावेळी मोटारसायकलवरून तीन हल्लेखोर आले. तिथे येताच त्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही कारवाई करत गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. जवांन त्यांच्यामागावर होते. दहशतवाद्यांना एका भागात घेरण्यात आलं. अतिरिक्त जवानही घटनास्थळी आले आणि त्यांनीही दहशतवाद्यांना घेरलं. यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला.
पोलीस जखमी
चकमकीत एक पोलिस जखमी झाला आहे. रात्री उशिरापर्यंत दहशतवादी घरात लपून होते. संपूर्ण परिसर घेरण्यात आला आहे. यामुळे दहशतवाद्यांना पळण्याची संधी मिळणार नाही. अंधारामुळे ऑपरेशन करणं अवघड आहे. कारण हा भाग दाट लोकवस्तीचा आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times