जालना: राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे अचानक मोठ्या प्रमाणात खुली केली व बाधित रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढून बेडस् उपलब्ध झाले नाहीत तर मग आपण रुग्णांना ठेवायचे कुठे?, असा प्रश्न विचारत राज्याचे आरोग्यमंत्री यांनी मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करणाऱ्या भाजपला फटकारले. मंदिर खुली केली जातील पण योग्य वेळेस त्याबाबत निर्णय होईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. ( slams and )

वाचा:

अंबड येथे शनिवारी आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. भाजपने मंदिरे खुली करण्यासाठी जे आंदोलन केले त्यात केवळ राजकारण आहे. असे राजकारण त्यांनी करू नये. मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने निर्णय घेत आहेत. त्यांच्या पाठिशी सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन टोपे यांनी केले.

मंदिरात जाऊन दर्शन घेणे प्रत्येकालाच आवडणारा विषय आहे. हा श्रद्धेचा भाग आहे. या ठिकाणी राजकारणाचा अजिबात संबंध असण्याचे कारण नाही. या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांचीच इच्छा असते परंतु आज प्राप्त परिस्थितीत करोना बाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या बघता अचानकपणे सगळं खुलं केलं आणि रुग्णालयात बेडस् उपलब्ध झाले नाहीत तर मग रुग्णांना काय बाहेर ठेवायचे का?, असा सवाल टोपेंनी उपस्थित केला.

वाचा:

मंदिरे बंदच राहावीत, अशी कुणाचीही इच्छा नाही. मंदिरे आणि सर्वच धार्मिक स्थळे सुरू झाली पाहिजेत परंतु ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने व्हावी, अशी मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांच्या या इच्छेचा आदर केला गेला पाहिजे, असेही टोपे यांनी पुढे नमूद केले.

फडणवीसांनी नागपुरातही थोडे लक्ष घालावे!

विरोधी पक्षनेते हे बारामतीत दौरा करतात. त्याला कुणाचीच हरकत नाही. त्यांनी जरूर सगळी माहिती घ्यावी परंतु करोना संसर्गाच्या साथीच्या संदर्भात त्यांनी राजकारण करू नये. फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याचा अधिकार आहे मात्र नागपूर मध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी नागपूरमध्येही थोडे लक्ष घालावे, असा टोला टोपे यांनी यावेळी लगावला.

वाचा: वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here