झाशी: पतीच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नसल्याने पत्नीनेही दोन तासात प्राण सोडले. उत्तर प्रदेशातील झाशी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकापाठोपाठ एक दोघांचे मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बघौरा गावात राहणारे ५० वर्षीय प्रीतम हे रविवारी नेहमीप्रमाणे म्हैस घेऊन शेतात गेले होते. या गावात पावसाळ्यात बंधाऱ्याचे पाणी शेतात शिरते. प्रीतम शेतात गेले तेव्हा पाण्याची पातळी कमी होती. मात्र, आजूबाजूच्या भागात पाऊस झाल्याने पाण्याची पातळी अचानक वाढली. प्रीतम यांना याची कल्पना नव्हती आणि सायंकाळी शेतातून घरी परतत असताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

नवरा व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज करतो, रस्त्यात थांबवून… बायकोची पोलिसात तक्रार, अन्…
बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर प्रीतम यांची चप्पल बंधाऱ्याच्या काठावर सापडली. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला आणि प्रीतमचा मृतदेह बाहेर काढला. प्रीतम यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर शोककळा पसरली. तर दोन तासांनंतर प्रीतम यांच्या पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, असे नातेवाईक सांगतात. या दाम्पत्याला एक मुलगा आणि २ मुली आहेत.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

पतीच्या अंत्यसंस्काराच्या आधीच पत्नीचा मृत्यू

पतीच्या मृत्यूची बातमी कळताच ४७ वर्षीय पत्नी गीता आजारी पडल्याा. त्यांने कसलेही भान राहिले नाही. इकडे शवविच्छेदनानंतर प्रीतम यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. मात्र, त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच पत्नीने जीव सोडला. या दोघांवरही एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटेनेने सारं गाव हळहळलं आहे.

दारुच्या दुकानात गेला, मग असं काही केलं की… एक निर्णय अन् तरुण रातोरात कोट्यधीश झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here