जवाहरनगर: मणिपूरमधील महिला अत्याचारांचे व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजस्थानातील भिलवाडा इथे मुलीवर बलात्कार करुन तिची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह भट्टीत टाकण्यात आला. या सर्व घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. ताजी घटना तेलंगणाच्या जवाहरनगरातील आहे. एका व्यक्तीनं दारुच्या नशेत तरुणीची रस्त्यात छेड काढली. तरुणीनं विरोध करताच मद्यधुंद अवस्थेतील तरुणानं भररस्त्यात तिचे कपडे काढले.मद्यधुंद अवस्थेतला तरुण छेड काढत असताना पीडित तरुणी आरडाओरडा करत होती. मदतीसाठी याचना करत होती. मात्र कोणीच आरोपी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. वाटसरुंनी बघ्याची भूमिका घेतली. काही जण घटनेचा व्हिडीओ आणि फोटो काढत राहिले. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बालाजीनगरात हा प्रकार घडला. आरोपीची ओळख पटली आहे. पेद्दा मरय्या (३०) असं त्याचं नाव आहे. त्याला दारुचं व्यसन आहे.रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास आरोपी त्याच्या आईसोबत बालाजीनगरमधील बस स्टँडकडे जात होता. त्याचवेळी २८ वर्षांची स्थानिक तरुणी पायी जात होती. तिला पाहताच मरय्यानं तिच्यावर हात टाकला. तिच्याशी गैरवर्तन करु लागला. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणीनं मरय्याला धक्का दिला. यामुळे मरय्या संतापला. त्यानं तरुणीवर हल्ला केला. जबरदस्तीनं तिचे कपडे फाडले.भररस्त्यात हा प्रकार सुरू असताना मरय्याची आई तिथेच उभी होती. आरोपीनं तिथून जात असलेल्या एका दुचाकीस्वार महिलेवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी निर्वस्त्र अवस्थेत रस्त्यावर बसून रडत होती. मात्र कोणीच तिच्या मदतीला पुढे आलं नाही. आरोपी तिथून गेल्यानंतर काही जण तिच्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी तिला चादर दिली. घटनेची माहिती जवाहरनगर पोलीस ठाण्याला देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here