नवी दिल्लीः रिलायन्स समूहाची ( ) सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड () कंपीन ही फ्युचर समूहाचा रिटेल आणि घाऊक व्यवसाय आणि लॉजिट्स्टिक्स व वेअरहाउसिंग व्यवसाय विकत घेणार आहे. कंपनीने शनिवारी पत्रक प्रसिद्ध करून याबाबत माहिती दिली. , ईझीडे आणि FBB च्या देशातील ४२० शहरांमध्ये पसरलेल्या १८०० हून अधिक स्टोअर रिलायन्सच्या मालकीचे होतील. फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्सने २४,७१३ कोटींच्या डीलवर शिक्कामोर्तब झालंय.

डीलनुसार फ्यूचर समूहाचा रिटेल आणि घाऊक व्यवसाय रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाईल लिमिटेड (RRFLL) अंतर्गत येईल. RRFLLच्या विलिनीकरणानंतर आरआरएफएलएल फ्यूचर एंटरप्राइजेस लिमिटेडमध्येही गुंतवणूक करेल. रिलायन्स १२०० कोटींची प्रेफरेंन्शियल इश्युद्वारे गुंतवणूक करेल आणि फ्यूचर एन्टरप्रायजेस लिमिटेडमधील ६.०९ टक्के हिस्सा खरेदी करेल.

ईशा अंबानी काय म्हणाले

रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी यांनी डीलनंतर माहिती दिली. छोट्या व्यापाऱ्यांसह सक्रिय सहकार्याच्या अनोख्या मॉडेलने रिटेल उद्योगाच्या विकासाची गती सुरू ठेवू, अशी आम्हाला आशा आहे. देशभरातील ग्राहक आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असं ईशा अंबांनी म्हणाल्या.

रिटेल आणि घाऊक उपक्रमाची संपूर्ण मालकी सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाइल लिमिटेडकडे (RRFLL) हस्तांतरित करण्यात येत आहे. लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग समावेश RRVL कडे वर्ग करण्यात येत आहेत. अधिग्रहाणचा भाग म्हणून, फ्यूचर ग्रुप काही कंपन्यांना फ्यूचर एंटरप्राइजेज लिमिटेड (FEL) मध्ये विलीन करेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here